पुणे

संपूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी चालवले ‘सखी मतदान’ केंद्र

CD

पारगाव, ता. १३ : आंबेगाव विधानसभा मतदारसंघातील अवसरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केंद्र क्रमांक १८४ मध्ये महिला मतदान केंद्र उभारले असून त्या केंद्रामध्ये सर्व मतदान अधिकारी, शिपाई व पोलिस कर्मचारी या सर्व महिला कार्यरत होत्या. यामुळे यामतदान केंद्राला ‘सखी मतदान’ केंद्र असे नाव देण्यात आले होते. केंद्रामध्ये प्रवेशद्वाराजवळ आकर्षक अशी कमान उभारली गेली आहे. गुलाबी फुग्याने प्रवेशद्वार सजवून गुलाबी सुंदर रांगोळी काढली होती. संपूर्ण मतदान केंद्र हे गुलाबी रंगाने सजविले होते. हे गुलाबी मतदान केंद्र विशेष करून महिला मतदारांसाठी आकर्षण ठरले. महिला मतदारांचे मतदान केंद्रांवर गुलाब पुष्प देवून स्वागत केले.

शिरूर (क्रमांक ३६) लोकसभा मतदार संघअंतर्गत १९६ आंबेगाव विधानसभा मतदारसंघ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्र निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे बनविण्यात आली होती. त्याअंतर्गत अवसरी बुद्रुक येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत हे ‘सखी मतदान’ केंद्र उभारले होते.
तसेच मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी एक, दोन व तीन यांची बैठक व्यवस्थेला देखील सजविले होते. तसेच महिलांना मतदान करण्यासाठी आकर्षित करणे करिता सेल्फी पॉइंट तयार केला होता. मतदान करण्यासाठी आलेले संपूर्ण कुटुंब या सेल्फी पॉइंटला सेल्फी काढत होते. मतदान करून लोकशाही बळकट करण्याकरिता मतदान केंद्रामध्ये स्लोगन लावले असून मतदान केंद्राशेजारी हिरकणी कक्षाची स्थापना केली होती. महिला मतदारांचे मतदान केंद्रांवर गुलाब पुष्प देवून स्वागत केले.
मतदान केंद्रास मतदार जनजागृती पथकाच्या नोडल अधिकारी सविता माळी, सुनील भेके, नारायण गोरे, तुषार शिंदे, अशोक लोखंडे, राहुल रहाटडे, अभिजित नाटे, विनायक राऊत, सुरेश रोंगटे, मंगेश जावळे, काशिनाथ घोंगडे, सचिन तोडकर यांनी मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT