पुणे

लाखणगावात मेंढ्यांची चार कोकरे ठार

CD

पारगाव, ता. १६ : लाखणगाव (ता. आंबेगाव) येथील शिववस्ती येथे शेतकरी दिलीप रोडे यांच्या शेतामध्ये मेंढपाळ संजय कऱ्हे यांच्या वाड्यावर बिबट्याने
बुधवारी (ता.१५) दुपारी हल्ला केला. मेंढीची चार कोकरे ठार केली. तसेच एक कोकरू जखमी करून बिबट्याने दोन कोकरे घेऊन पळाला आहे.
लाखणगाव, देवगाव, काठापूर बुद्रुक या ठिकाणी दिवसेंदिवस बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्ले वाढतच चालले आहेत. कोकरांचा मृत्यू झाल्याने संजय कऱ्हे यांचे पंचवीस ते तीस हजार रुपयांचे नुकसान झाले.
घटनेची माहिती समजताच वनविभागाच्या वनरक्षक साईमाला गीते, अशोक जाधव तसेच पशुवैद्यकीय डॉ. पुरी यांनी घटनास्थळी भेट देऊन मृत कोकरांचा पंचनामा करण्यात आला.
दरम्यान, बिबट्याचे हल्ले वाढत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दिवसाढवळ्या हा हल्ला झाल्याने शेतात पाणी भरण्यासाठी जाण्यास भीती वाटत आहे. यामुळे वनविभागाने परिसरात पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी बाळासाहेब रोडे, दिलीप रोडे, बाळासाहेब आरगडे, संजय रोडे आणि स्थानिक शेतकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

IND vs WI T20I: वेस्ट इंडिजच्या ट्वेंटी-२० संघात बदल; भारताला झोडणाऱ्या खेळाडूची एन्ट्री, तिसरी वन डे जिंकल्यावर आलाय कॉन्फिडन्स...

'दृश्यम'च्या पहिल्या दोन भागात दिसला पण तिसऱ्यात नाही, मराठी अभिनेत्याला वाटतंय वाईट; म्हणतो - गायतोंडेने...

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

Mumbai News: 'ती' चारचाकी आयात नव्हे! उच्च न्यायालयाचे सीमा शुल्क विभागाला आदेश

SCROLL FOR NEXT