पुणे

भूसंपादनाबाबत आज पारगाव येथे बैठक

CD

पारगाव, ता.६ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातून पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग क्रमांक ११ करिता भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी व परिसरातील शेतकरी यांची बैठक शुक्रवारी (ता. ७) सकाळी ११ वाजता पारगाव येथील भीमाशंकर कारखाना येथे आयोजित केली आहे.

रेडीरेकनरचा दर वाढवून मिळत नाही तोपर्यंत शेतकरी जमिनी देणार नसल्याची भूमिका बाधित शेतकऱ्यांनी घेतली आहे. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेवरून बाधितांचे म्हणणे व तक्रारी ऐकून घेण्यासाठी तसेच महामार्गाबाबत सविस्तर माहिती बैठकीत दिली जाणार आहे. अशी माहिती खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिली.

बैठकीला पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचे भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुन्नर/आंबेगाव गोविंद शिंदे, उपजिल्हाधिकारी भूसंपादन विभाग कल्याण पांढरे, तहसीलदार संजय नागटीळक, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, रामदास वळसे पाटील उपस्थित राहणार आहे. बैठकीस शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वाळूंज यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : गणेशोत्सवात पुण्याच्या मध्यवर्ती भागातील बारा प्रमुख रस्त्यांवर जड वाहनांना बंदी

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT