पुणे

आंबेगाव तालुक्यातही ड्रोनच्या घिरट्या

CD

पारगाव ता. २ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील काठापूर बुद्रुक, लाखणगाव, पोंदेवाडी, खडकवाडी, जारकरवाडी आदी गावांमध्ये रात्रीच्या वेळी मागील आठ दिवसांपासून ड्रोनच्या घिरट्या सुरू असून, रात्री उशिरा अंधारात हे ड्रोन कशासाठी फिरतात, याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून भीतीचे वातावरण पसरले आहे.
मागील दोन आठवड्यापासून जिल्ह्यातील विविध भागांमध्ये रात्रीच्या वेळी काही गावांमध्ये ड्रोनच्या घिरट्या वाढल्या आहेत. तसाच प्रकार आठ दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात दिसून येत आहे. या सर्व गावांच्या मध्यभागी असणाऱ्या डोंगराच्या परिसरात विशेष करून हे ड्रोन फिरताना दिसून येतात. या डोंगराच्या चारही बाजूला चार गावे असून, याच डोंगराच्या सभोवतालच्या परिसरात या घिरट्या दिसून येत आहेत. त्यामुळे नक्की हे ड्रोन रात्री कशासाठी उडवतात, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम व भीती निर्माण झाली आहे.
एकावेळी तीन- तीन ड्रोन या परिसरात उडत असल्याने नागरिकांनी एकमेकांना फोन करून याबद्दल माहिती दिली. रात्रीच्या वेळी उडणारे हे ड्रोन उंचीवरून उडत असल्याने या ड्रोनचा आकार व क्षमता जास्त असू शकते. सोमवारी (ता. १) रात्री खडकवाडीच्या वडदरा परिसरात ड्रोनने घिरट्या घातल्या. काही तरुणांनी या ड्रोनचे मोबाईलमध्ये व्हिडीओ काढले.
साधारण हे ड्रोन रात्री साडेदहा ते अकरानंतर आकाशात फिरतात, परंतु ते कशासाठी फिरतात, हे मात्र अद्याप समजले नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, प्रशासनाने यासंदर्भातील माहिती घेऊन नागरिकांमधील भीती दूर करावी, अशी मागणी खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज, पोंदेवाडीचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर, नीलेश पडवळ व गुरुदेव पोखरकर यांनी केली.

काही गावांतून नागरिकांचे फोन आले असून, रात्रीच्या वेळी ड्रोन घिरट्या घालत आहे. आम्ही वरिष्ठ कार्यालयाला माहिती दिली असून, तपास सुरु आहे.
- नेताजी गंधारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पारगाव कारखाना पोलिस ठाणे

पोंदेवाडी (ता. आंबेगाव) : रात्रीच्या वेळी घिरट्या घालत असलेल्या ड्रोनचा व्हिडिओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड, उड्डाणावेळी...; गुजरात दौऱ्यात काय घडलं?

Nashik Land Scam: 'टंकलेखनातील चूक' सांगत ९८ हजार चौ.मी. जमीन गायब? पीटीसीसमोरील ६२ एकर जमीन प्रकरणात जिल्हा प्रशासनाचा खंडपीठात अहवाल

Latest Marathi News Update : एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यातील विसंवाद काल पासून दूर होण्यास सुरुवात

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात गणेशोत्सवातील देखाव्यातून विरोध; राजू शेट्टी, सतेज पाटील, जयंत पाटलांना भावनिक साद

Devendra Fadnavis: पिके करपली, दुष्काळाचे संकट गडद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले एनडीआरएफची वाट पाहणार नाही, आधीच शेतकऱ्यांना मदत देणार

SCROLL FOR NEXT