पुणे

मेंगडेवाडीत अंत्यविधीवेळी नागरिकांवर मधमाशांचा हल्ला

CD

पारगाव ता. ५ : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शनिवारी सकाळी दहा वाजता अंत्यविधीसाठी जमलेल्या नागरिकांवर मधमाशांनी हल्ला केला. यामध्ये चार ते पाच जणांना मधमाशांनी जास्त प्रमाणात चावा घेतल्याने त्यांच्यावर निरगुडसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.

मेंगडेवाडी येथील काशिनाथ बबन मेंगडे (वय ६८) यांचे शनिवारी पहाटे दीड वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधी कार्यक्रम मेंगडेवाडी येथील स्मशानभूमीत सकाळी दहा वाजता सुरू असताना अंत्यविधीप्रसंगी धुरामुळे झाडावर बसलेल्या आग्या मोहोळाच्या माशा उठल्या व त्यांनी जमलेल्या नागरिकांवर हल्ला केला. त्यावेळी एकच गोंधळ उडून नागरिक सैरावैरा पळू लागले. यात अनेक नागरिकांना मधमाशांनी चावा घेतला असून जास्त प्रमाणात चावा घेतलेल्या नागरिकांवर निरगुडसर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये वैभव कैलास मेंगडे (वय २८), विठ्ठल रामभाऊ मेंगडे (वय ८५), प्रणय ज्ञानेश्वर मेंगडे (वय २३), अक्षय नामदेव मेंगडे (वय २७), सुभाष पंढरीनाथ कुरकुटे (वय ५२) यांच्यावर निरगुडसर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic: पुणेकर झाले पोलिस! ४० लाख नागरिकांनी कमावून दिले १२ कोटी; ‘पीटीपी’ला राष्ट्रीय पुरस्कार

Pune Fraud News : बांधकाम व्यावसायिक महिलेची पावणेसहा कोटींची फसवणूक; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : महाराष्ट्रात आज कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Kirit Somaiya : बांगलादेशींना शोधण्यासाठी तीन वर्षातील जन्मदाखले तपासा; किरीट सोमय्या यांनी घेतली महापालिकेत बैठक

Naresh Mhaske : सुज्ञ जनतेने काँग्रेस आणि आघाडीला धुळ चारली; नरेश म्हस्के यांचे विरोधकांवर टीकास्त्र

SCROLL FOR NEXT