पारगाव, ता. १८ : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील भोकरवाडीमध्ये भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात महिला शेतकरी भामाबाई प्रभाकर करंडे यांच्या एका शेळीचा व दोन करडांचा मृत्यू झाला असून, एक शेळी गंभीर जखमी झाली आहे.
भोकरवाडी येथील भामाबाई करंडे यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य गुरुवारी (ता. १६) शेतात शेतीकाम व पिकाला पाणी भरण्यासाठी गेले होते. त्यावेळी सायंकाळी चार वाजता घरासमोर बांधलेल्या शेळ्यांवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. शेळ्यांच्या आवाजाने रस्त्यावरून जाणारी विद्यार्थिनी रिद्धी करंडे हिने त्या शेजारील लोकांना बोलावून कुत्री हुसकावून लावली. परंतु, तोपर्यंत कुत्र्यांच्या केलेल्या हल्ल्यात दोन करडांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जखमी शेळी काही तासांनी दगावली, तर एक शेळी मृत्यूशी झुंज देत आहे. त्यामुळे महिला शेतकरी भामाबाई प्रभाकर करंडे यांचे सुमारे ४० हजार रुपयाचे नुकसान झाले.
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील विविध गावांमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर हॉटेल, ढाबे वाढलेले आहेत. या ठिकाणचे शिल्लक अन्न फेकून दिले जाते. या अन्नावर अनेक भटकी कुत्री जगत असतात. तसेच, गावांमध्ये अनेक भटकी कुत्री वावरत असतात. परंतु, ही कुत्री अन्न मिळाले नाही तर टोळीने इतरत्र हिंडत असताना. अशावेळी अनेक पाळीव प्राण्यांवर ही कुत्री हल्ले करतात. गावात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून ग्रामपंचायतीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.