पारगाव, ता. १६ : ‘‘उन्हाचा कडाका सध्या वाढत आहे. यामुळे डोंगरावर, माळरानावर मोठ्या प्रमाणावर वणवा लागण्याचे प्रमाण वाढले आहे. वनविभागाच्या धामणी वन परिमंडलाच्या वतीने आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावांमध्ये वणवा प्रतिबंधासाठी जनजागृतीचे फलक लावले आहेत तसेच अनेक ठिकाणी गस्त सुरू ठेवून प्रबोधन, जन जागृती करण्यात आहे,’’ अशी माहिती धामणी वन परिमंडलाच्या वनपाल सोनल भालेराव यांनी दिली.
उन्हाळ्यात विशेष करून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात धामणी, लोणी, पहाडदरा, मेंगडेवाडी, शिरदाळे, वडगावपीर, मांदळेवाडी, जारकरवाडी गावाच्या हद्दीत वनविभागातर्फे नुकतीच जाळ रेषा तयार करण्यात आली.
जंगलाला आग लावल्यास भारतीय वन अधिनियम १९२७ चे २६(१) (ब) आणि (क) तसेच वन्यजीव (संर्षण) अधिनियम १९७२ नुसार अपराध आहे. वणवा लावणाऱ्यास भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम २६(१) नुसार, नुकसानी किंमत आणि पाच हजार रुपये दंड व दोन वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद असल्याचे वनपाल सोनल भालेराव यांनी सांगितले.
विहीर, बोअरवेल, ओढे, नाले कोरडे पडतात वन्य प्राण्यांच्या नैसर्गिक वस्तीस्थानांना इजा पोहचल्याने बिबट, रानडुकरे, तरस, लांडगे, कोल्हे मानवी वस्तीकडे येतात त्यामुळे जंगले वणवे लावून नष्ट करू नका लोकसहभागातून जंगलाचे वणव्यापासून रक्षण करू या.
- विकास भोसले, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी
05222
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.