पुणे

लोणीतील शर्यतीत धावले ३९० बैलगाडे

CD

पारगाव, ता. ४ : लोणी (ता. आंबेगाव) येथे महाशिवरात्र यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले होते. यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीत एकूण ३९० बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला. विजेत्या बैलगाडा मालकांना एकूण इनाम दोन लाख ७५ हजार १११ रुपये रोख, तसेच चार एलसीडी टीव्ही, दोन भव्य ट्रॉफी, दोन कुलर, दोन टॉवर फॅन, एक मोटार सायकल बक्षीस देण्यात आले.
यावेळी आयोजित शर्यतीत प्रथम क्रमांकात फळीफोडचा मान बंटी ज्ञानेश्वर कामठे (कवठे) व महादू मारुती भोर (खडकी) यांचा बैलगाड्यांनी मिळवला. द्वितीय क्रमांकात श्रेयशकुमार रंगनाथ करंजखेले (धामणी) व माउली पांडे (मुखई), तृतीय क्रमांकात लहू लक्ष्मण पोळ (कवठे) व सर्जेराव नामदेव दळवी (कान्हूर मेसाई), चतुर्थ क्रमांकात दत्ता सुदाम रणपिसे (चिंचगाईवाडी) व श्रेयश दत्तात्रेय चवरे (धामणी) यांच्या गाड्यांनी फळीफोडचा मान मिळवला. घाटाचा महाराज किताब किरण हनुमंत जाधव व कैलास गावडे यांच्या गाड्याने मिळवला.
शर्यतीला महसूल मंत्रालयाचे सचिव डॉ. कैलास गायकवाड, सरपंच सावळेराम नाईक, माजी विद्यार्थी विकास प्रबोधनीचे अध्यक्ष उदय वाळुंज, चेतन लोखंडे, बाळासाहेब ज्ञानोबा गायकवाड, पांडुरंग गायकवाड यांनी भेट दिली. शर्यतीची व्यवस्था अशोक आदक पाटील, पिंटू पडवळ, बाळासाहेब गायकवाड, संदीप आढाव, नामदेव वाळुंज, सतीश थोरात, सोनबा वाळुंज, विकास पंचरास , समीर शिनलकर यांनी पाहिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hormuz Strait: ४८ तासांनंतर होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची घोषणा, नेमकं काय घडलं?

Vinod Kambli Health : विनोदला ब्रेन स्ट्रोकचा धोका; माजी क्रिकेटपटू एकत्र आले, आर्थिक मदतीसाठी WhatsApp ग्रुप, मित्राची माहिती

“त्यांच्यासोबत काम मास्टरक्लाससारखं वाटायचं" अक्षय कुमारने दिला असरानी यांच्या आठवणींना उजाळा ; भूतबंगला सिनेमात केलं अखेरचं काम

शुक्राच्या वृषभ राशीतील संक्रमणामुळे तयार होतोय पंचमहापुरुष राजयोग ! कोणत्या राशींना होणार फायदा घ्या जाणून

RCB vs LSG Live: विराट कोहलीचे प्लेइंग इलेव्हनमध्ये नाव नाही, आजच्या सामन्याला मुकला? रजत पाटीदारचा महत्त्वाचा निर्णय

SCROLL FOR NEXT