पुणे

खडकवाडी बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे अतिसंवेदनशील

CD

पारगाव, ता. १८ : खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे सोमवारी (ता.१७) सायंकाळी मोटारसायकलवर चाललेल्या रामदास गोविंद सुक्रे (वय ५४) यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. त्यांच्या पायावर पंजा मारून जखमी केले केले. याच परिसरात एक महिन्याच्या कालावधीत बिबट्याची हल्ल्याची ही चौथी घटना आहे. यामुळे हा परिसरात बिबट्याच्या हल्ल्याबाबत अतिसंवेदनशील बनला आहे. वनविभागाने बिबट्याचे हल्ले रोखण्यासाठी विविध उपाय योजना करूनही हल्ले थांबत नसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याच्या हल्ल्याबाबत हा भाग अतिसंवेदनशील बनला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने मंगळवारी (ता.१८) येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी तीन पिंजरे बसवले असल्याची माहिती मंचर वनपरीक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली. खडकवाडी येथील खुडावस्ती येथे सोमवारी सायंकाळी सुक्रे हे विहिरीवरील मोटार सुरू करून मोटारसायकलवर शेतात पाणी भरण्यासाठी चालले होते. रस्त्याच्या कडेच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. मात्र त्यांनी न घाबरता मोटारसायकल थांबवून जोरात रेसचा आवाज काढला. या आवाजाने बिबट्याने पळ काढला. सुक्रे यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे वनपाल सोनल भालेराव यांनी सांगितले.

दरम्यान, याच वस्तीवर फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात रात्रीच्या वेळी एका पाठोपाठ चाललेल्या तीन मोटारसायकलवर बिबट्याने हल्ला केला. पहिल्या दोन मोटारसायकल स्वारांनी बिबट्याचा हल्ला चुकवला परंतु तिसऱ्या मोटारसायकल वर पाठीमागे बसलेल्या श्रेया मच्छिंद्र डोके या तरुणीच्या पायाला बिबट्याने चावा घेऊन जखमी केले आहे. मोटारसायकल पळवल्याने बहीण भाऊ थोडक्यात बचावले होते.
यानंतर एक आठवड्याच्या अंतराने शेजारील वाळुंजनगर येथे रात्रीच्यावेळी मोटारसायकलवर बिबट्याने हल्ला करून पाठीमागे बसलेल्या गणेश दत्तात्रेय मुखेकर यांच्या पायाला चावा घेऊन गंभीर जखमी केले होते. चारच दिवसापूर्वी खडकवाडी येथील मुळूकवस्ती येथील शंकर वाकुंज हे आपली पत्नी रंजना वाळुंज हे दोघे दुचाकीवरून धामणी खिंडीतील ज्ञानेश्वर मंदिर या ठिकाणी कीर्तनास जात असताना बिबट्याने दुचाकीवर हल्ला केला यामध्ये रंजना वाळुंज यांच्या पायाला दुखापत झाली. दरम्यान, काल पुन्हा सुक्रे यांच्यावर बिबट्याने हल्ला केला. या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. बिबट्याच्या हल्ल्याबाबत हा परिसर अतिसंवेदनशील बनला असल्याने बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने वेगवेगळ्या तीन ठिकाणी तीन पिंजरे बसवले आहेत.


खडकवाडी परिसरात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना थांबत नसल्याने वनविभागाने बिबट्याची चाहूल लागण्यासाठी तालुक्यात प्रथमच या ठिकाणी एआय आणि एज कॉम्प्युटिंग तंत्रज्ञानयुक्त मशिन तसेच कोणताही जंगली प्राणी परिसरात आल्यास त्याची माहिती मिळण्यासाठी अनायडर मशिन बसवले. त्याच बरोबर गावडेवाडी बिबट शीघ्र कृती दलाच्या वतीने या भागात दररोज गस्त घालून जनजागृती केली जात आहे. नागरिकांनीही एकट्याने फिरू नये शेतात काम करण्यासाठी समुहाने जावे.
- विकास भोसले, वनपरिक्षेत्र अधिकारी


05371

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Mock Drill: मॉक ड्रिलदरम्यान स्मोक ग्रेनेडचा स्फोट; अहिल्यानगरात चार पोलिस कर्मचारी जखमी, ग्रेनेडची पिन पडली अन् काय घडलं!

RCB vs GT, Qualifier 1 सामन्यावर पडणार पावसाचं पाणी? सामना रद्द झाला, तर कोण गाठणार फायनल? वाचा नियम

Devendra Fadnavis Onion Crop : कांदा उत्पादकांचा प्रश्न निकाली निघणार? देवेंद्र फडणवीसांनी केंद्रात केलं बैठकीचं आयोजन; विरोधकांवरही टीका

LPG Alternative India : महाग 'एलपीजी'ला पर्याय! नितीन गडकरी यांनी लॉंच केली स्वस्त आणि पर्यावरणपूरक इथेनॉल शेगडी

Everest Base Camp: दादांची शिकवण अन् लेकीची जिद्द; नयना बोऱ्हाडे यांची एव्हरेस्ट बेस कॅम्पवर दमदार कामगिरी

SCROLL FOR NEXT