पुणे

पारगावात मिरवणूक, धार्मिक प्रवचन

CD

पारगाव, ता. ११ : पारगाव (ता. आंबेगाव) येथे भगवान महावीर स्वामी यांची प्रतिमा मिरवणूक, धर्मिक प्रवचन आदी कार्यक्रमाद्वारे जैन बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात महावीर जयंती साजरी करण्यात आली.
महावीर जयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी येथील बाजारपेठेतून भगवान महावीर यांच्या प्रतिमेची मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीत मांजरवाडी, रांजणी, वळती, पिंपरखेड, जांबुत, काठापूर बुद्रुक, निरगुडसर, पारगाव, सविंदणे, लाखणगाव, शिंगवे, नागापूर, खोडद, निघोज या १४ गावांतील जैन बांधव सहभागी झाले होते. ग्रामस्थ व व्यापारी बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी भगवान महावीर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीची सांगता येथील तनिष्का मंगल कार्यालयात झाली. मधुर व्याख्यानी प.पु. डॉ. प्रतिभाश्रीजी महाराज साहेब (म.सा.) व मधुरभाषी डॉ. प्रशंसाजी महाराज साहेब (म.सा.) यांचे धार्मिक प्रवचन झाले.
कार्यक्रमाचे नियोजन आंबेगाव तालुका जैन महासंघ अंतर्गत श्री. सकल जैन समाज पारगाव, काठापूर, नागापूर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran Deal : अमेरिका-इराण अंतिम करार पुन्हा खोळंबला, डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'या' २ नव्या मागण्यांनी वाढवलं टेन्शन

Online Gaming करताय? तर तुमच्या मोबाईलमध्ये असली पाहिजे 'ही' एक गोष्ट, मोठ्या धोक्यांपासून करेल सुरक्षा

'मला मूल नको होतं' पूजा भट्टने सांगितलं घटस्फोट घेण्याचं कारण, म्हणाली...'नात्यात एकटेपणा हा...'

Rainwater Harvesting: आदर्श मान्याचीवाडी होणार आता पाण्याचीवाडी; घरोघरी रेन वॉटर हार्वेस्टिंग, पावसाचे पाणी साठवणाऱ्या घरांचीच होणार नोंद

समर्थ रामदास स्वामींच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित !

SCROLL FOR NEXT