पारगाव, ता. १८ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील वाडावस्ती येथे घोड नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील संरक्षक कठड्याचे लोखंडी पाइप चोरट्यांनी गुरुवारी (ता. १८) मध्यरात्रीच्या सुमारास लंपास केले.
पारगाव परिसरात भुरट्या चोरांचा पुन्हा उपद्रव वाढला आहे. घोड नदी, तसेच मीना नदीवर असलेल्या कोल्हापूर पद्धतीचे बंधारे, तसेच छोट्या पुलांचे संरक्षक कठड्याचे लोखंडी पाइप चोरट्यांनी लक्ष्य केले आहेत. येथील वाडावस्तीमधील छोट्या पुलाचे संरक्षक कठडे (लोखंडी पाइप) चोरट्यांनी गुरुवारी (ता. १७) लंपास केले. पारगाव परिसरात घोड, मीना नदीच्या पात्रांवर अनेक ठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांना संरक्षण कठडे म्हणून लोखंडी पाइप लावलेले आहेत. अनेक बंधारे हे निर्जनस्थळी असल्याने त्याचा भुरट्या चोरट्यांनी फायदा घेतला आहे. गुरुवारी (ता. १७) चोरट्यांनी वाडा वस्ती येथे लोखंडे- माळी मळ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर छोट्या पुलाचे संरक्षण कठडे लंपास केले. कठड्यांचे लोखंडी पाइप पळवून नेले. माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे यांनी पारगाव कारखाना पोलिस ठाण्यात घटनेची खबर दिली. पोलिस उपनिरीक्षक भाऊसाहेब लोकरे, पोलिस हवालदार अजित मडके, दिव्या नवले यांनी शुक्रवारी सकाळी घटनास्थळांची पाहणी केली. यावेळी काळूराम लोखंडे, सूरज ढोबळे,विठ्ठल लोखंडे, रवींद्र ढोबळे आदी शेतकरी उपस्थित.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.