पुणे

हिंगोली, अकोल्यातील मजुरांवर भिस्त

CD

पारगाव, ता. २६ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा काढणीच्या कामाला वेग आला आहे. अंगाची लाही लाही करणारा कडक उन्हाळा त्यामुळे उन्हात काम करण्यास स्थानिक मजूर मिळत नाही. हिंगोली, यवतमाळ, वाशीम, अकोला जिल्ह्यातील मजुरांना मागणी वाढली आहे. एका मजुराला दिवसाला ५०० रुपये देऊन त्याची जेवणाची व राहण्याची व्यवस्था उत्पादक शेतकऱ्याला करावी लागत असल्याने कांदा काढण्याच्या मजुरी खर्चावर जास्त पैसे खर्च करावे लागत आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात घोडनदी किनारी तसेच डिंभा उजव्या कालव्या लगत असलेल्या अवसरी बुद्रुक, टाव्हरेवाडी, मेंगडेवाडी, जारकरवाडी, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळुंजनगर, पारगाव, देवगाव , काठापूर बुद्रुक, लाखणगाव या गावात खरीप व रब्बी या दोन्ही हंगामात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते.
सध्या कांदा रब्बी हंगामातील उन्हाळी कांदा काढणी सुरू आहे. एकरी सरासरी २५० ते ३०० कांदा पिशवी उत्पादन निघत आहे. वातावरणात तीव्र उष्णता जाणवत असल्याने त्यामुळे उन्हात काम करण्यास स्थानिक महिला मजूर मिळत नसल्याने मजुरांचा तुटवडा भासत आहे.

सध्या कांद्याला चांगला बाजारभाव मिळत नसल्याने काढलेला कांदा बराकीत साठवून बाजारभाव वाढल्यानंतर कांदा विक्रीला नेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे सांगितले.
- संतोष रामभाऊ सुक्रे, कांदा उत्पादक शेतकरी, खडकवाडी (ता. आंबेगाव)


हिंगोली जिल्ह्यात पाणी नसल्याने शेतात काही पिके नसतात उन्हाळ्यात हाताला काही काम नसते. यामुळे आम्ही कांद्याचे क्षेत्र असणाऱ्या भागात एकत्रित समुहाने जाऊन मजुरी करतो. दिवसातील १२ तास काम करतो. स्थानिक मजूर आठ तास काम करतात.
- राम संतोष जाधव, शेत मजूर, गाडीभोरी ता. हिंगोली (जि. हिंगोली)

05520

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT