पारगाव, ता. २६ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील गावांमध्ये उन्हाळी बाजरीचे पीक जोमात बहरले आहे. अवसरी परिसरात कणसे फुलोऱ्यात असून, काही ठिकाणच्या कणसामध्ये टपोरे दाणे भरू लागले आहेत.
तालुक्याच्या पूर्वभागात घोडनदी व डिंभा धरणाच्या उजव्या कालव्याच्या लगत असणाऱ्या अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, जारकरवाडी, बढेकरमळा,धामणी, पोंदेवाडी, खडकवाडी, वाळुंजनगर, रामनळा, पारगाव, काठापुर बुद्रुक, देवगाव व लाखणगाव या गावातील शेतीसाठी बाराही महीने पाणी उपलब्ध झाले आहे.
शेतामध्ये बाजरीच्या कणासामध्ये टपोरे दाणे पहावयास मिळत आहे. या वर्षी उन्हाळी बाजरीचे चांगले उत्पादन मिळेल असे अवसरी बुद्रुक येथील शुभम श्यामराव चवरे याने सांगितले. जऊळके (ता. खेड), पहाडदरा (ता. आंबेगाव) तसेच अकोले तालुक्यातील आदिवासी ठाकर समाजातील अनेक कुटुंबे उदरनिर्वाहासाठी बागायती गावात वास्तव्य करतात व अर्धलीने शेती करतात. जऊळके (ता. खेड) येथील बाळासाहेब खंडागळे यांनी अवसरी बुद्रुक येथील शुभम चवरे यांच्या दोन एकर क्षेत्रात बाजरीचे पीक अर्धलीने केले आहे. श्री. खंडागळे यांची दोन्ही मुले रवींद्र व गौरी खंडागळे हे दोघे बहीण भाऊ शाळेला सुट्टी लागल्याने बाजरीच्या राखणाचे काम करत आहे.
05522
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.