पारगाव, ता. ३१ : मेंगडेवाडी (ता. आंबेगाव) बाजरीच्या कणसातील दाण्यांना हिरवे मोड आले आहेत. पावसामुळे बाजरी खाण्यायोग्य राहिली नाही. यामुळे हाता तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवाल दिल झाले आहेत.
तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक, मेंगडेवाडी, पोंदेवाडी, पारगाव, लाखणगाव, लोणी, धामणी, खडकवाडी, वाळुंजनगर, वडगावपीर, काठापूर बुद्रुक या भागात मागील आठवड्यात सलग चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडला. यामुळे शेतातील सर्वच पिकांचे मोठे नुकसान झाले. अवसरी बुद्रुक येथील संजय हिंगे यांच्या शेतातील काढून ठेवलेल्या बाजरीच्या कंसातील दाण्यांना मोड आल्याने मोठे नुकसान झाले आहे.
मेंगडेवाडीतील महिला शेतकरी रोहिणी संजय मेंगडे यांच्या दीड एकर क्षेत्रातील बाजरीचे पीक काढणीला आले असताना मुसळधार पाऊस झाला सलग चार पाच दिवस पाऊस पडल्याने बाजरीच्या कणसातील दाण्यांना हिरवे मोड आल्याने बाजरी खाण्यायोग्य राहिली नसल्याने मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी रोहिणी मेंगडे यांनी केली आहे.
05685
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.