पारगाव ता. १६ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील लोखंडे (माळी) मळा येथे विजेचा धक्का लागून जर्सी गाईचा मृत्यू झाला आहे. ही घटना
सोमवारी (ता.१६) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे शेतकरी तान्हाजी बबन लोखंडे यांचे पाऊण लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
शेतकरी यांची लोखंडे यांच्या गोठ्यात एकूण तीन गाई व तीन कालवडी आहेत. गोठ्यातील गाई मोठ्याने हंबरण्याचा आवाज आल्याने तान्हाजी लोखंडे, त्यांची पत्नी मंगल लोखंडे व शेजारील बाळासाहेब लोखंडे धावत गोठ्यात गेले तर कडेला बांधलेली गाई खाली पडलेली दिसली. मंगल लोखंडे यांनी गाईला उठवण्यासाठी हात लावला असता मंगल लोखंडे यांनाही विजेचा धक्का लागला. त्या लगेच बाजूला सरकल्या. त्यामुळे त्या थोडक्यात वाचल्या. मात्र, गाईचा मृत्यू झाला.
गोठ्यात कडेला असलेल्या लोखंडी जाळीत पावसामुळे वीज प्रवाह उतरला असावा व त्या जाळीला गाई खेटल्याने विजेचा धक्का बसला असावा. असा अंदाज तान्हाजी लोखंडे यांनी व्यक्त केला आहे. गोठ्या लगत विजेचा लोखंडी खांब आहे. तो खांब पावसाने ओला झाला असून, त्यातून वीज प्रवाह खाली आला असेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संबंधित शेतकऱ्यास शासन व महावितरण कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी उपसरपंच विठ्ठल ढोबळे व बाबू लोखंडे यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.