पुणे

मुंबईत ‘द ट्रेल डायरीज’चे प्रकाशन

CD

पारगाव, ता. ५ : धामणी (ता.आंबेगाव) जाधव परिवाराची नात तसेच माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची पणती अमायरा चव्हाण वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी ‘द ट्रेल डायरीज’ ही साहसकथा लिहून बालसाहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकले आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या रंगस्वर सभागृहात शनिवारी ( ता. ५) संपन्न झालेल्या प्रकाशन सोहळ्यात मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी, राष्ट्रीय आधुनिक कला संग्रहालयाच्या संचालिका निधी चौधरी, प्रसिद्ध चरित्र लेखिका रीता राममूर्ती गुप्ता, महसूल विभागाचे सचिव डॉ. कैलास गायकवाड आणि बालसाहित्यिक राजीव तांबे आदी मान्यवरांच्या हस्ते ‘द ट्रेल डायरीज’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
हे पुस्तक देशातील अग्रगण्य प्रकाशन संस्थांपैकी एक असलेल्या पेंग्विन रॅण्डम हाऊसच्या सहसंस्थेने पारट्रीचने प्रकाशित केले आहे. साहसी आणि कल्पनारम्य कथानक असलेल्या पुस्तकाची लेखिका अमायरा चव्हाण अवघ्या ११ वर्षाची असुन दिल्ली पब्लिक स्कूल (नेरूळ , नवी मुंबई ) येथे सहावीत शिकत आहे. अमायरा हिचे वडील क्रीडा संघटक ॲड. चेतन दादासाहेब चव्हाण हे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नातू तर आई वैशाली चव्हाण-जाधव या मुंबई येथे अतिक्रमण व निष्कासन विभागात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. तिचे आजोबा बी. जी. जाधव यांनी धामणीचे सरपंच म्हणून काम पहिले आहे.
प्रकाशन सोहळ्यास धामणीच्या सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, माजी सरपंच बी. जी. जाधव , ग्रामपंचायत सदस्य प्रतीक जाधव, संग्राम जाधव, रोहिदास जाधव, अजित बोऱ्हाडे, प्रमोद वाघ, पहाडदऱ्याचे उपसरपंच कैलास वाघ उपस्थित होते.

05811

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Reform: ट्रॅक्टर खरेदीवर मिळणार मोठी सूट; नवीन जीएसटी दरांचा थेट शेतकऱ्यांना फायदा

RBI Strategy : ट्रम्प टॅरिफनंतर आरबीआयचा मोठा निर्णय! भारताची आर्थिक ढाल मजबूत करण्यासाठी काय पाऊल उचललं?

Pani Puri’s Unique Names by State: पदार्थ एक पण नावे अनेक..! देशभरात पाणीपुरीला वेगवेगळी नावे, बंगालमध्ये पुचका तर राजस्थानात...

Latest Marathi News Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाब, हिमाचल प्रदेशमधील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

Shakti Peethas in India: देवीच्या अदृश्य कृपेचा अनुभव घ्यायचा आहे? या ५ शक्तिपीठांना नक्की भेट द्या

SCROLL FOR NEXT