पुणे

पोंदेवाडीतील ज्येष्ठ महिलेच्या घरात चोरी

CD

पारगाव, ता. ३०: पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील चंद्रभागा तबाजी पोखरकर (वय ७३) यांच्या बंद घराच्या दरवाजाची कडी चोरट्यांनी तोडली व एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवी तसेच पीककर्ज भरण्यासाठी ठेवलेले रोख ५० हजार रुपये असा दीड लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी (ता. ३०) पहाटेच्या सुमारास घडली आहे.
टाकळकरवस्ती येथे चंद्रभागा पोखरकर या शेताच्या कडेला असलेल्या घरी एकट्याच राहतात. त्यांची दोन्ही मुले, सुना व पती भोसरी येथे राहतात. घर एकांटी असल्याने त्या रात्रीच्या मीरा मारुती जांभळे यांच्या घरी झोपायला जातात. दरम्यान, शुक्रवारी (ता. २९) रात्री जांभळे यांच्या घरी झोपायला गेल्या होत्या. त्या आज सकाळी घरी घरी आल्या तर त्यांना कुलपाची कडी तोडल्याचे लक्षात आहे. घरातील पेटी, पलंग यातील सर्व साहित्य चोरट्यांनी अस्तावस्त टाकून दिले होते. चंद्रभागा घरची शेती पाहून मोलमजुरीला जातात. सोसायटीचे पीककर्ज भरण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपये जमा करून डब्यात ठेवले होते. पैशांबरोबर गळ्यातील एक तोळा वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, चांदीची जोडवीही ठेवली होती. हा डबा पलंगामध्ये ठेवला होता. डब्यातील ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याचे पाहून त्या जोरात ओरडू लागल्या. त्यामुळे जवळच राहणारे मीरा जांभळे धावून आले. त्यांनी माजी सरपंच अनिल वाळुंज, उपसरपंच महेंद्र पोखरकर, अमोल वाळुंज यांना घटनेची माहिती दिली. सर्वांनी
पारगाव कारखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नेताजी गांध्यारे यांना चोरीची माहिती दिली.

दरम्यान, चारच दिवसापूर्वी पोंडदेवाडी येथील तळ्याच्या पाण्यावर वडदरा (खडकवाडी) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतीसाठी ग्रामसमृद्धी पाणीपुरवठा योजना केली होती. या योजनेच्या कृषी पंपाच्या फ्यूज पेटीतील दोन स्टार्टर, मोटारीची केबल असा एकूण ८० हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला, अशी माहिती गुरुदेव पोखरकर यांनी दिली.

06013

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: गणेशभक्तांना दिलासा! मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक रद्द, विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय; पहा वेळापत्रक

CM Devendra Fadnavis : ‘’गणरायाकडे एकच मागणे मागायचे असते ते म्हणजे..’’ ; जाणून घ्या, मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Ajit Pawar : प्रभाग रचनेवर आता रडत बसू नका; निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा

Mumbai Local: २००हून अधिक लोकल फेऱ्या वाढणार, प्रवाशांना दिलासा मिळणार; रेल्वे प्रशासनाची योजना काय?

Latest Marathi News Updates : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT