पुणे

भीमाशंकर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी

CD

पारगाव, ता. ३१ : दत्तात्रेयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखाना अधिमंडळाची २०२४-२५ या आर्थिक वर्षाची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी (दि. ४) दुपारी दोन वाजता कारखान्याचे संस्थापक संचालक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत व कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.
वार्षिक सभेमध्ये मागील सभेचा कामकाज वृत्तांत वाचून कायम करणे, संस्थेच्या २०२४-२५ वर्षासाठीचा कामकाज अहवाल, नफा-तोटा पत्रक व ३१ मार्च २०२५ रोजीचा ताळेबंद स्वीकारणे व मंजूर करणे, २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या लेखापरीक्षण अहवालाची नोंद घेणे व २०२३-२४ वर्षाचा लेखापरीक्षण दोष दुरुस्ती अहवाल स्वीकारणे, २०२५-२६ वर्षासाठी वैधानिक लेखापरीक्षकाची नेमणुक व शुल्क ठरविणे, २०२४-२५ वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी जास्त झालेल्या जमाखर्चास मान्यता देणे, भाग विकास निधी रक्कमेच्या विनियोगास मान्यता देणे, भाग विकास निधी व भीमाशंकर शिक्षण संस्था निधी कपातीस मान्यता देणे, स्क्रॅप मटेरियल विक्रीस मान्यता देणे, स्थापत्य भांडवली कामाच्या खर्चास कार्योत्तर मान्यता देणे इत्यादी विषयी चर्चा होणार आहे. सर्व सभासदांनी सभेस उपस्थित रहावे असे आवाहन अध्यक्ष बेंडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : आंतरराष्ट्रीय शांतता दिनानिमित्त पुण्यात आज मुस्लिम समाज काढणार शांतता मोर्चा

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT