पुणे

लोणीतील ज्येष्ठाच्या जिद्दीला सलाम

CD

पारगाव, ता. १२ : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात डोंगराच्या कुशीत वसलेल्या पहाडदऱ्यातील ७२ वर्षाचे बबन ढगा केदारी टनटनीच्या झाडाच्या फोकांपासून गेल्या ५० वर्षांपासून कोंबड्या डालण्याचे डालं बनवत आहे. बनवलेले डालं घेऊन परिसरातील वाड्यावस्त्यावर पायपीट करून शेतकऱ्यांना विक्री करत आहे ते डालं विणण्याची कला अवगत असलेले पंचक्रोशीतील ते एकमेव ज्येष्ठ आहेत. त्यांनी बनवलेल्या डाल्याला परिसरातील शेतकऱ्यांची चांगली मागणी असते.
ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातील महिला गावरान कोंबड्या पाळत असतात. त्यांना रात्रीच्या वेळी ठेवण्यासाठी झाडाच्या फोकांपासून बनवलेले डालं वापरले जाते. काही शेतकरी शेळ्यांच्या नुकत्याच जन्मलेली करडे ठेवण्यासाठी डाल्याचा उपयोग करतात. परंतु अशा प्रकारची डालं मिळणे आता दुरापास्त झाली आहे. ती विणणे कला आता कोणाकडे अवगत नाही. ही कला अवगत असलेले आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागातील लोणी धामणी परिसरातील पहाडदऱ्याच्या ठाकरवाडीतील आदिवासी ठाकर समाजातील बबन केदारी हे एकमेव आहेत ते आसपासच्या डोंगर दऱ्यात किंवा ओढ्याच्या काठावर असलेल्या टनटनीच्या झाडाच्या फोक काढून आणतात नंतर त्या साळल्या जातात मग त्यापासून डालं विणले जाते एक डालं विणण्यासाठी पूर्ण एक किंवा दोन दिवस लागतो. ते बनवलेले डालं घेऊन आसपासच्या गावात ५ ते १० किलीमिटरची पायपीट करून त्याची विक्री करायची एका डालं विकून केदारी यांना अवघे ३५० ते ४०० रुपये मिळतात बबन केदारी हे वृद्धपकाळातही गरिबीमुळे जगण्यासाठी करत असलेली धडपड तसेच त्यांच्या कष्टाच्या जिद्दीला सलाम करावसा वाटतो

06067

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZP Reservation: राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर; ३४ जिल्ह्यांची यादी बघा

Asia Cup 2025: भारताच्या 'या' दोन खेळाडूंमुळे India vs Pakistan सामन्याची तिकीटं विकली जात नाहीत; एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचा मोठा दावा

Latest Marathi News Updates Live : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सशस्त्र सीमा दलाने (SSB) एक विशेष 24x7 हेल्पलाइन सुरू केली

Vasantha Ramaswamy : माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Navratri 2025: आपण नवरात्र का साजरी करतो? हे आहे आध्यात्मिक महत्त्व आणि कारण

SCROLL FOR NEXT