पुणे

काठापुरात रंगले रोमहर्षक बैलगाडा शर्यतीचे मैदान

CD

पारगाव, ता. ७ : आंबेगाव तालुक्यात प्रथमच तीन फेऱ्यांच्या बैलगाडा (छकडी) शर्यतींचे रोमहर्षक मैदान पार पडले. काठापूर बुद्रुक येथील पिरसाहेब यात्रा उत्सवानिमित्त काठापूर बुद्रुक केसरी’ ही मानाची स्पर्धा पार पडली. सुधीर खांडेभराड-बाळू पोटे, नाशिक शार्दुल ग्रुप यांचा राजा व बाजी या बैलजोडीने प्रथम क्रमांक पटकविला. यावेळी महाराष्ट्रातील अनेक नामवंत बैल व ४५० गाडीमालकांनी स्पर्धेत सहभाग घेतला. विजेत्या रोख पाच लाख रुपयांची बक्षीसे देण्यात आली.

या स्पर्धेसाठी जळगाव, मनमाड, येवला, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, फलटण, कल्याण, अंबरनाथ, ठाणे, रायगड, पनवेल, पुणे, श्रीगोंदा अशा ठिकाणावरून लांबून लांबून बैलगाडी मालक सहभागी झाले होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी एक लाख २१ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.

यात्रेचे नियोजन सुनील पोखरकर, हनुमंत जाधव, कमलेश ढोरे, किरण करंडे, तानाजी जाधव, सुदर्शन करंडे, निवृत्ती करंडे, माजी उपसरपंच विशाल करंडे, सुभाष जाधव, विठ्ठल टिंगरे, बबन जाधव, बाळासाहेब नरे, नरहरी करंडे, बजरंग करंडे, रामदास करंडे, एकनाथ ढमाले व परिसरातील तरुण मंडळी यांसह ग्रामस्थांनी नियोजन पाहिले.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, अरुण गिरे, जयसिंग एरंडे, रवींद्र करंजखिले, अनिल वाळुंज, सागर गवळी, काकासाहेब गवळी, सचिन वावरे, रामकृष्ण टाकळकर, शिवाजी निघोट, वैभव उंडे, सुहास बाणखेले, श्वेता ढोबळे यांसह अनेक मान्यवरांनी या स्पर्धेला हजेरी लावली.
यावेळी निकाली पंच किरण गारगोटे, नीलेश कबाडी, किरण जाधव, झेंडा पंच म्हणून बापू धनवडे, आनंद जगदाळे, नंबर टेकर म्हणून सुनील झांबरे यांनी काम पहिले, निवेदन सुनील मोरे, विकास जगदाळे, मयूर तळेकर, रनजित बनसोडे यांनी केले.

हे आहेत विजेते
दुसरा क्रमांक -साहिल प्रतिष्ठान कल्याण व पांडुरंग काळे यांचा (हारण्या आणि जलवा), तिसरा क्रमांक -पप्पू खांडेभराड, शाकिर पठाण छत्रपती संभाजीनगर व संतोष तोडकर ठाणे यांचा (साई ११११ आणि वजीर), चौथा क्रमांक- वनिता धनवडे यांचा (वडकीचा पिस्टन २२११ आणि गिरवीचा रुद्रा), पाचवा क्रमांक- सुनील पोखरकर हनुमंत जाधव यांचा (लखन ११९७ आणि कबीरा), सहावा क्रमांक- इंदलकरांचा सुंदर आणि गरुड ग्रुपचा सुंदर, सातवा क्रमांक -संतोष जाधव घोटचा सर्जा २५२६ आणि वाटेगावकरांचा बादल, आठवा क्रमांक - वैभव टेमकर, रामदास कराळे यांचा सुंदर आणि मुरल्या या बैलांनी क्रमांक पटकाविला.

06191

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NHAI-Jio safety alert system: ‘हायवे’वरील धोक्यांचा इशारा आता मोबाइलवर आधीच कळणार ; 'NHAI-Jio' मध्ये करार!

मैदानी चाचणी फेब्रुवारीपासून! पोलिस भरतीत एका पदासाठी ८३ उमेदवार; इच्छुकांना रविवारपर्यंत करता येईल अर्ज; १५,६३१ पदांची भरती

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारचं मोठं विधान; कर्मचाऱ्यांची 'ही' मागणी फेटाळून लावली

Pune Voter List : मतदार यादीवर हरकत नोंदविण्यासाठी आज शेवटचा दिवस; हरकतींची संख्या १२ हजाराच्या वर!

Ahilyanagar Leopard Attack : बिबट्याच्या अचानक हल्ल्याने भागूबाई खोडदे यांचा बळी; पारनेर तालुक्यात भीतीचं वातावरण!

SCROLL FOR NEXT