पारगाव, ता. १४ : पारगाव (ता. आंबेगाव) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शुक्रवारी (ता. १४) बाल दिनाचे औचित्य साधून माजी उपसरपंच सचिन दत्तात्रेय अस्वारे यांच्या स्वर्गीय बाजीराव अस्वारे स्पोर्ट क्लबच्या वतीने पोषण आहार योजनेसाठी लागणारी भांडी, बादल्या, टोप आदी साहित्य देण्यात आले.
जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहार बनवण्यासाठी लागणारी भांडी जुनी व खराब झाली होती. शालेय व्यवस्थापन समिती आणि माजी विद्यार्थी संघ यांच्या मागणीला प्रतिसाद देत माजी उपसरपंच सचिन अस्वारे यांनी ही भांडी दिली आहे.
या प्रसंगी सरपंच श्वेता ढोबळे, सचिन अस्वारे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संतोष लबडे, काळूराम लोखंडे, शालेय व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी शंकर देवडे, अश्पाक शेख, फिरोज शेख, रवींद्र अस्वारे, गोरक्ष बापू ढोबळे व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय वळसे यांनी, तर मुख्याध्यापक संतोष लबडे यांनी आभार मानले.
06334