पारगाव, ता. २९ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील पडवळवस्तीवर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पिंजरा बसवला आहे. पडवळ, मखर आणि रोडे वस्तीवर गेल्या काही दिवसांपासून रात्री बिबट्या सतत येत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात काम करण्यासाठी किंवा साधे घराबाहेर पडण्यासाठी सुद्धा नागरिक धजावत नव्हते. स्थानिक नागरिकांच्या वतीने नीलेश पडवळ यांनी माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे वनविभागाला पिंजरा बसवण्यासाठी सूचना करण्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार शनिवारी (ता. २९) मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी तातडीने बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या ठिकाणी पिंजरा लावला आहे.
6387
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.