पुणे

खंडोबा यात्रेसाठी धामणीत बैठक

CD

पारगाव, ता. १८ : उत्तर पुणे जिल्ह्यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या धामणी (ता. आंबेगाव) येथील कुलदैवत म्हाळसाकांत खंडोबाच्या माघी पौर्णिमेला १ व फेब्रुवारीला होणाऱ्या यात्रेच्या नियोजनाची पहिली बैठक पंचांच्या पारावर रविवारी (ता. १८) संपन्न झाली. शासनाच्या सर्व परवानगी घेऊन सर्व नियमांचे पालन करून, तसेच यात्रा कालावधीत फलक बंदीची कडक अंमलबजावणी करून पारंपरिक पद्धतीने देवाची तळी भरून भंडार उधळून यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी रवींद्र करंजखेले, सरपंच अक्षय विधाटे, सागर जाधव, पहाडदऱ्याचे सरपंच मच्छिंद्र वाघ, उपसरपंच कैलास वाघ, वामनराव जाधव, वसंत जाधव, आनंदा जाधव, तंटामुक्ती अध्यक्ष नितीन जाधव, पोलिस पाटील सूरज जाधव यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. दरवर्षीप्रमाणे नवसाची बैलगाडा शर्यत, आखाडा, तमाशा, हारतुरे व कलगीतुरा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. त्याचप्रमाणे देवाची पालखीची (छबीना) मिरवणूक आकर्षण असणार आहे, असे सरपंच विधाटे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Husband Attacks Wife Friend : नाशिकच्या गोदाघाटावर रक्ताचा सडा! पत्नीला मित्रासोबत फिरताना पाहून पतीनं जे केलं, ते पाहून तुम्हीही हादरून जाल

Nashik Krushikumbh : नाशिकमध्ये 'कृषिकुंभ-२०२६'चा जागर! एआय तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीचे मिळणार धडे

E- Sakal No.1 Marathi News Protal : डिजिटल युगात मराठी पत्रकारितेचा दबदबा; कॉमस्कोरमध्ये ई-सकाळची कामगिरी नंबर 1

Sangli Zilla Parishad Politics : सांगली जिल्हा परिषदेत ‘व्हीप’वरून अजित पवार गटात दुफळी, जिल्हाध्यक्षांकडे झेडपी अध्यक्ष; जयंत पाटलांची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये झेरॉक्स कॉपी पुरवल्याप्रकरणी संबंधित केंद्र संचालक आणि शिक्षकांवर होणार कारवाई

SCROLL FOR NEXT