पारगाव, ता. ५ : जारकरवाडी (ता. आंबेगाव) येथील बढेकरमळ्यात शेतात पाणी भरत असलेल्या किरण शांताराम बढेकर (वय ३५) या तरुणावर बिबट्याने गुरुवारी (ता.५) सायंकाळी झडप घालून जखमी केले. यावेळी बाजूच्या शेतातील तरुणांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या शेजारच्या शेतात पळून गेला आहे.
पारगाव लोणी रस्त्यालगत बढेकरमळा आहे. हनुमंत दहिवळ यांच्या गव्हाच्या शेतात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या शिरल्याचे काही शेतकऱ्यांनी पहिले होते. त्यामुळे मळ्यातील तरुण एकत्र येऊन आवाज करत आरडाओरडा करून बिबट्याला शेतातून पळवून लावण्याचा प्रयत्न करत होते. गव्हाच्या शेताच्या शेजारी असलेल्या शेताला किरण बढेकर पाणी देत असताना तरुणांच्या आवाजाने गव्हाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने किरण यांच्यावर झडप मारली. यावेळी किरण खाली वाकल्याने बिबट्याची उडी शेताच्या बांधाच्या पलीकडे गेल्याने त्यांच्या पाठीला बिबट्याच्या पंज्याने जखमा झाल्या. यावेळी शेजारच्या शेतात असलेल्या तरुणांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला. धामणीच्या माजी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे यांनी वन विभागाला फोन करून घटनेची माहिती दिली.
अवसरी बुद्रुक – गावडेवाडी बिबट शीघ्रकृती दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी जाऊन जखमी किरण यास मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आले. बढेकर यांची प्रकृती स्थिर आहे. वनरक्षक योगेश निघोट व अस्मिता शिंदे यांनी किरण बढेकर यांची भेट घेऊन माहिती घेतली आहे. सुरेश मारुती बढेकर यांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी केल्याने वनविभागाने त्वरित गुरुवारी सायंकाळी या घटनास्थळी पिंजरा लावला आहे.
06571
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.