पारगाव, ता. १९ : धामणी (ता. आंबेगाव) येथील धामणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रंगनाथ गजाराम जाधव यांची, तर उपाध्यक्षपदी शांताबाई बोऱ्हाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी सुमित्रा चौधरी- बेंडे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी/ संस्थेचे सचिव सुभाष सोनवणे यांनी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बोलावलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या. अध्यक्षपदासाठी जाधव यांचा, तर उपाध्यक्षपदासाठी बोऱ्हाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी संचालक सतीश जाधव, बाळासाहेब बढेकर, जयदीप चौधरी, बाळासाहेब बोऱ्हाडे, कोंडीभाऊ तांबे, सुधाकर जाधव , दीपक जाधव, रामदास विधाटे, सुमन जाधव, सदाशिव गाढवे उपस्थित होते. नवनिर्वाचित अध्यक्ष जाधव व उपाध्यक्ष बोऱ्हाडे यांचा बाजार समितीचे सभापती नीलेश थोरात यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी रामदास म्हातारबा जाधव, प्रतीक जाधव, डॉ. नारायण जाधव, गोपाळ रोडे, आनंदा जाधव, बाळासाहेब बढेकर, मनोज तांबे, डॉ. पाटीलबुवा जाधव उपस्थित होते.
06641, 06642
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.