पारगाव, ता. २१ : पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील पोखरकरवस्ती येथे भरदुपारी बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील कपाटाचे कुलूप तोडून सुमारे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, तसेच चांदीच्या पट्ट्या, मासोळी, जोडवी चोरून नेल्या.
पोंदेवाडी येथील पोखरकर वस्ती येथे विजय पांडुरंग नरवडे, पत्नी सोनाली व लहान मुलासह राहतात. शुक्रवारी (ता. २०) सकाळी सहा वाजता विजय नरवडे नेहमीप्रमाणे शिक्रापूर येथील कंपनीत कामावर गेले. पत्नी सोनाली नरवडे या दुपारी दीड वाजता घरातील कामे उरकून घराला कुलूप लावून मुलाला घेऊन जवळच राहणाऱ्या वडिलांच्या घरी गेल्या. पुन्हा दुपारी साडेतीन वाजता सोनाली या घरी आल्या असता घराच्या दरवाजाचे कुलूप तोडलेले दिसले. बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र, तीन तोळे वजनाची चेन, अडीच ग्रॅम वजनाचे बदाम, प्रत्येकी अर्धा तोळा वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, अर्धा तोळा वजनाचे कर्णफुले, चांदीच्या पट्ट्या, जोडवी, मासोळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचे निदर्शनास आले. पारगाव कारखाना पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून अनोळखी व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.