पुणे

धामणीतील शेतकऱ्यांच्या लढ्याला यश

CD

पारगाव, ता. ११ : धामणी (ता. आंबेगाव) येथील शेतकऱ्यांनी आपल्या हक्काच्या पाण्यासाठी आणि शेती वाचवण्यासाठी दिलेल्या लढ्याला अखेर यश आले. विधानसभेच्या अधिवेशनात मंगळवारी (ता. १०) माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी उपसा सिंचन योजनांच्या वीजजोडासंदर्भात प्रश्न उपस्थित केला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य अभियंत्यांना १५ दिवसांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले.
तालुक्याच्या पूर्व भागात दुष्काळी गाव म्हणून ओळख असलेल्या धामणी गावातील शेतकरी एकत्र येत सामुदायिक उपसा सिंचन योजना राबवण्यास सुरुवात केली, परंतु राज्यात यापुढे शेतीपंपासाठी नवीन वीज जोड देणे बंद केल्यामुळे धामणी परिसरात एकूण सुमारे साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून सुरू होत असलेल्या नऊ उपसा सिंचन योजना अडचणीत आल्या आहेत. या सर्व उपसा सिंचन योजनांना शासनाने विशेष बाब म्हणून तातडीने वीज जोड द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी (ता. ५) माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले, सरपंच अक्षय विधाटे, माजी सरपंच सागर जाधव, रेश्मा बोऱ्हाडे, मंगेश नवले, प्रतीक जाधव, वामन जाधव यांच्यासह सुमारे ३०० ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण करून शासनाचे लक्ष वेधले होते. प्रश्न मार्गी लागला नाहीतर आंदोलन तीव्र करण्याचा ग्रामसभा घेऊन ग्रामस्थांनी निर्धार केला होता.
या आंदोलनाची तातडीने दखल घेऊन वळसे पाटील यांनी अधिवेशनात धामणी येथील शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्य अभियंत्यांना १५ दिवसांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन निर्णय घेण्याचे आदेश दिले. तसेच, अशा अपवादात्मक परिस्थितीत धोरणांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario : ४ जागांसाठी ७ संघांमध्ये शर्यत! प्ले ऑफमध्ये पोहोचण्याची कोणाला किती संधी? जाणून घ्या डोकं चक्रावून टाकणारं समीकरण

IPL 2026 Playoff Race: विजयासह कोलकाता नाइट रायडर्सची गाडी पुढे सरकली; दिल्ली कॅपिटल्सचे पॅकअप, Finn Allen चे वादळी शतक

Pune tenant & PG rules : पुण्यात भाडेकरू, पेईंग गेस्ट, वापरलेल्या वाहनांच्या व्यवहारांची माहिती पोलिसांना देणे अनिवार्य

Onion Price Crash: सटाणा बाजारात कांद्याला ५० रु. दर; संतप्त शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळला

SSC Result : मंगळवेढा दहावी निकालात ५.८४ टक्के घसरण; इंग्लिश स्कूलची स्वर्णश्री धनंजय पाटील ९९.८० टक्क्यांसह तालुक्यात अव्वल

SCROLL FOR NEXT