पारगाव, ता.२० : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथील घोडनदीवर असलेल्या बंधाऱ्याचे लोखंडी संरक्षक कठडे तुटल्याने बंधारा वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. पाटबंधारे विभागाने बंधाऱ्याच्या कठड्याची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे यांनी केली आहे.
येथील बंधारा तालुक्याच्या पूर्वभागातील सर्वात मोठा व जुना बंधारा आहे. घोडनदीच्या दक्षिणेला काठापूर बुद्रुक व उत्तरेला शिरूर तालुक्यातील काठापूर खुर्द हे गाव आहे. या बंधाऱ्यावरून दोन्ही गावातील नागरिक मोठ्या प्रमाणावर ये-जा करतात शेतातील मशागतीसाठी जाण्यासाठी किंवा शेतमालाची वाहतूक करण्यासाठी या बंधाऱ्याचा वापर केला जातो. भीमाशंकर साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस वाहतूक करणाऱ्या टायरगाड्या या बंधाऱ्यावरून मोठ्या प्रमाणावर जात असतात. सध्या बंधारा पाण्याने तुडूंब भरला आहे. गेली अनेक महिन्यापासून बंधाऱ्याच्या लोखंडी संरक्षक कठड्याचे अनेक ठिकाणी पाइप तुटल्याने रात्रीच्या वेळी दुर्घटना घडण्याचा धोका असल्याने तातडीने बंधाऱ्याच्या संरक्षक कठड्याची दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.