पारगाव, ता. १५ : लोणी (ता. आंबेगाव) येथील बांधकाम मजुराची मुलगी मोहिनी मारुती सुरवसे हिची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महसूल सहाय्यक पदी निवड झाली आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत जिद्दीने मिळवलेल्या या यशाचे परिसरात कौतुक होत आहे.
येथील मारुती आणि सुरेखा सुरवसे हे दांपत्य गेल्या ३० वर्षांपासून खडी फोडण्याचे व मजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. स्वतःची जागा नसल्याने हे कुटुंब भाड्याच्या खोलीत राहते. अशा परिस्थितीत मोहिनीने जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. तिने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण लोणीत, तर पदवीचे शिक्षण राजगुरुनगर येथील हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातून पूर्ण केले. सन २०२४ च्या महसूल सहाय्यक परीक्षेच्या निकालात तिने बाजी मारली.
मोहिनीच्या यशासोबतच तिच्या भावंडांचा संघर्षही प्रेरणादायी आहे. तिचा भाऊ करण पोस्टमास्तर म्हणून काम करत शिक्षण घेत आहे, तर बहीण पायल दररोज सहा तासांचा प्रवास करून पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेण्यासाठी जाते. मोहिनीच्या या यशाबद्दल महसूल विभागाचे सहसचिव डॉ. कैलास गायकवाड, चेतन लोखंडे आणि पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
06857
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.