पारगाव, ता. ६ : रानमळा (ता. आंबेगाव) येथे बिबट्याने रस्त्यावरून चाललेल्या मोटारसायकलवर
मंगळवारी (ता.५) सायंकाळी हल्ला केला. यामुळे प्रशांत अरुण रोकडे (वय ३४, रा. लोणी, ता. आंबेगाव) हे जखमी झाले आहेत.
मोटारसायकलवरून अक्षय व प्रशांत अरुण रोकडे हे दोघे भाऊ कामानिमित्त लोणीवरून पोखरकरमळा (वडगावपीर) येथे चालले होते. रानमळा हद्दीत भामची विहीर परिसरात मोटारसायकल आली असता रस्त्याच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने मोटारसायकलवर मागे बसलेल्या प्रशांतवर झेप घेतली. यामध्ये त्यांच्या डाव्या पायावर हल्ला करून जखमी केले आहे. ग्रामस्थ व वनविभागाचे कर्मचारी यांनी प्रशांत रोकडे यांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने बुधवारी (ता.६) सकाळी पिंजरा लावला आहे, अशी माहिती मंचर विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांनी दिली.
06928
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.