पुणे

सांगणोरेमध्ये ‘अनिवार्य संलग्नता’ उपक्रम

CD

आपटाळे, ता. १७ : जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील पिंपळगाव जोगा धरण परिसरातील सांगणोरे येथे ता. ९ ते १५ जुलैदरम्यान यशदा प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून ‘अनिवार्य संलग्नता’ या उपक्रमाअंतर्गत वर्ग एकच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी संलग्नता कालावधी पूर्ण केला. या उपक्रमाअंतर्गत वर्ग एकचे सहा अधिकारी सहभागी झाले होते.
राज्यातील वर्ग एक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, पुणे यांच्या माध्यमातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यामध्ये शीतल घोलप (उपजिल्हाधिकारी), सागर वाघमारे (तहसीलदार), अनिल काळे (सहाय्यक राज्यकर आयुक्त), प्रेरक उजगरे (शिक्षणाधिकारी), गौरव बंग (सहाय्यक राज्यकर आयुक्त) व रूपा मोहितकर (बाल विकास प्रकल्प अधिकारी) या अधिकाऱ्यांनी संलग्नता कालावधी पूर्ण केला. या कालावधीत अधिकाऱ्यांनी गावातील अंगणवाडी, प्राथमिक शाळा, बचत गट, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, कृषी सहायक कार्यालय आणि ग्रामीण आरोग्य उपकेंद्राला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virar News : आंतरराष्ट्रीय किर्तीचे बॅलेनृत्य कलाकार नरेश नारायण उसनकर यांचे निधन

CM Devendra Fadnavis : सहकार्याची नवी दारे होणार खुली; महाराष्ट्र-अमेरिकेतील आयोवा राज्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

Nashik News : शिवसेना (ठाकरे)-मनसेचा जनआक्रोश; नाशिकमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर एकत्र मोर्चा

Disha Patani house firing अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार; ‘या’ गँगस्टरने घेतली हल्ल्याची जबाबदारी!

Nepal Protests: नेपाळची संसद विसर्जित; सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान

SCROLL FOR NEXT