पुणे

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीची परदेशी विद्यार्थ्यांना भुरळ

CD

आपटाळे, ता. १० : जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरी येथे रविवारी (ता. १०) पुणे येथे शिक्षणासाठी आलेल्या विविध महाविद्यालयातील २८ देशांतील ८० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी किल्ले शिवनेरीला भेट देऊन गडाची माहिती घेतली. यावेळी छत्रपती शिवरायांच्या जन्मस्थळावर हे परदेशी विद्यार्थी नतमस्तक झाले. छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील गडकिल्ले हे प्रेरणादायी असल्याची भावना या विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने या भेटीचे नियोजन करण्यात आले होते.
किल्ले शिवनेरीला नुकतेच युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात नामांकन मिळाले आहे. नामांकन प्राप्त झाल्यानंतर प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने परदेशी पर्यटकांनी किल्ले शिवनेरीला भेट दिली. या परदेशी विद्यार्थ्यांमध्ये रशिया, दुबई, नेपाळ, श्रीलंका, कतार, कंबोडिया, सुदान, केनिया, दक्षिण आफ्रिका, बांगलादेश, येमेन, फिजी, इथिओपिया, युगांडा, नायजेरिया यांसह अन्य देशातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. हे विद्यार्थी पुणे येथील विविध महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थ्यांचे जुन्नर शहरात आगमन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकात मराठमोळी पद्धतीने ओवाळत व गांधी टोपी घालून स्वागत करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुन्नर तालुका संघचालक अरुण कबाडी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती प्रकाश ताजणे, राजेंद्र भगत, संतोष केदारी, संतोष कबाडी, सदूअण्णा मुंढे, दर्शन सोनवणे, धनंजय कळमळकर, प्रतीक पावडे यांनी स्वागत केले. या विद्यार्थ्यांचे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी शिवाई देवी मंदिर ट्रस्ट, भक्तिधाम देवस्थान ट्रस्ट व वनविभागाच्या वतीने स्वागत करण्यात आले. दुर्ग अभ्यासक विनायक खोत यांनी या विद्यार्थ्यांना किल्ले शिवनेरीची सविस्तर माहिती दिली. यावेळी गडाचे दरवाजे, अंबरखाना, बगीचा, शिवकालीन पाण्याच्या टाक्या, शिवजन्मस्थळ, शिवाई देवी मंदिर, लेणी, कडेलोट या भागांची माहिती विद्यार्थ्यांनी घेतली.

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची माहिती मिळाली. महाराजांचा इतिहास हा प्रेरणा देणारा आहे. महाराजांच्या गडकिल्ल्यांची व इतिहासाची माहिती आमच्या देशातील नागरिकांपर्यंत पोहोचविणे हे आमच्यासाठी भाग्याचे कार्य आहे. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी भविष्यामध्ये प्रयत्न करू.
- अँड्री, रशिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी मोठी सुचना! e-KYC OTP एरर येतोय? १५०० रुपये गमावण्यापूर्वी करा 'हे'! थेट सोल्यूशन दिलं...

Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादवच्या फॉर्मला लागलेलं 'ग्रहण' आज सुटणार? पाकिस्तानला बदड बदड बदडणार...

Thane Traffic: कल्याण-माळशेज महामार्गावर वाहतुकीत बदल; १८ दिवस शहाड उड्डाणपुल बंद; पाहा पर्यायी मार्ग

Solapur Rainfall : आधीच पुरानं सगळं धुऊन नेलं, आता आणखी किती पाणी येणार? सीनेबरोबरच भीमा नदीकाठीही पुराची वाढली धास्ती

Navratri 2025 Spiritual Purity: शारदीय नवरात्रीत चुकूनही माता दुर्गेला 'या' 5 वस्तू अर्पण करू नका, नाहीतर... भक्तांनी ठेवावी खबरदारी!

SCROLL FOR NEXT