Meta AI Speech Model : ‘मेटा’नं लाँच केलं नवीन ‘AI स्पीच मॉडेल’; भारतीयांसाठीही आहे Good News!

Meta Introduces Next-Gen AI Speech Model: जाणून घ्या, नेमकी कोणती आनंदाची बातमी आहे आणि या नव्या मॉडेलचे काय वैशिष्ट्ये आहे?
Meta unveils its latest AI Speech Model designed to support Indian languages, marking a major leap in voice technology and multilingual communication.

Meta unveils its latest AI Speech Model designed to support Indian languages, marking a major leap in voice technology and multilingual communication.

esakal

Updated on

Meta launches new AI Speech Model supporting Indian languages : मार्क झुकरबर्गच्या मेटाने AI नेच्या मदतीने एक क्रांतीकारी कामगिरी करून दाखवली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) स्पीच रेकग्निशनच्या क्षेत्रात मेटाने एक महत्त्वपूर्ण मॉडेल लाँच केलं आहे.  ज्याला ओम्निलिंग्युअल ऑटोमॅटिक स्पीच रेकग्निशन (ओम्निलिंग्युअल एएसआर) म्हटले जात आहे. शिवाय मेटाच्या या नवीन AI स्पीच मॉडेलची आता जगभर चर्चा सुरू झाली आहे.

विशेष म्हणजे मेटाच्या या AI स्पीच मॉडेलचा भारतीयांनाही मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे हे मॉडेल नक्कीच हीट ठरणार असल्याचं आताच सांगितलं जात आहे.  भाषा आणि एआय एकत्र करण्याच्या क्षेत्रात हे एक क्रांतिकारी मॉडेल असल्याचंही बोललं जात आहे.

कारण, या नवीन मॉडेलमुळे फक्त प्रादेशिक किंवा दुर्मिळ भाषा जाणणाऱ्या आणि इंग्रजी किंवा इतर प्रमुख भाषा न बोलता येणाऱ्या लोकांनाही एआय स्पीच वापरणं सहज शक्य होणार आहे. ज्यामुळे त्यांची कामेही आता सोपी होणार आहेत. जगभरातील अनेक देशांमधील सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.

Meta unveils its latest AI Speech Model designed to support Indian languages, marking a major leap in voice technology and multilingual communication.
Fake Tiger and Real Tiger Viral Video : खतरनाक!!! वाघाचं कातडं पांघरून जंगलातील वाघाच्या तोंडासमोर गेला पठ्ठ्या अन् मग...

या नवीन मॉडलेची वैशिष्ट्ये काय? –

आता तुम्ही आपल्या स्थानिक भाषेत एआयला प्रस्न विचारू शकाल, आता कोणतीही भाषा बोलणाऱ्यास एआयच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येईल, तुम्ही ज्या भाषेत प्रश्न विचाराल त्याच भाषेत तुम्हाला उत्तर मिळणार आहे, यामुळे सर्वसामान्यांनाही एआयच्या मदतीने कामे लवकर करता येणार आहे. विशेष म्हणजे मेटाचं हे नवं मॉडेल भारतातील दुर्मिळ भाषांमध्येही काम करणार आहे, त्यामुळे भारतामधील कोणत्याही राज्यातील भाषा किंवा बोली भाषा यामध्ये वापरता येतील.

Meta unveils its latest AI Speech Model designed to support Indian languages, marking a major leap in voice technology and multilingual communication.
Company Faced Major Fine : नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यानं टाकला असा डाव, की कंपनीलाच बसला मोठा दणका ; 'मोबाइल' ठरला कारण!

मेटाचे हे नवीन मॉडेल एआय स्पीचची पोहोच लक्षणीयरीत्या वाढवेल. या मॉडेलच्या प्रमुख वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्यात अनेक दुर्मिळ भारतीय बोलींचा समावेश आहे, ज्यामुळे ते जुन्या, प्राचीन आणि लुप्त होत चाललेल्या भाषांसह काम करण्यास पूर्णपणे सक्षम बनते.

Meta unveils its latest AI Speech Model designed to support Indian languages, marking a major leap in voice technology and multilingual communication.
Groom’s 10 Demands Before Marriage : लग्नाच्याआधी नवरदेवानं केल्या अशा काही मागण्या, की सासऱ्यांच्या डोळ्यात आलं पाणी!

मेटाचा दावा आहे की ते जगातील पहिले एआय मॉडेल आहे जे १६०० हून अधिक भाषा आणि बोली समजू शकते आणि ओळखू शकते. ते केवळ या १६०० पेक्षा अधिक भाषा आणि बोली समजत नाही तर दुर्मिळ आणि कमी-संसाधन असलेल्या भाषा समजून घेण्याची क्षमता देखील या मॉडेलचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com