पुणे

अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्यांत मनमानी

CD

आपटाळे, ता. ११ : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी प्रकल्प अधिकारीपदाचा गैरवापर करत अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती केल्या आहेत. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी खामगावचे माजी उपसरपंच राजेंद्र डुंबरे यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन डुंबरे यांनी आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त लीना बनसोड यांना दिले आहे.
प्रकल्प अधिकारी प्रदीप देसाई यांनी वर्ग ४ च्या पदावर अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती देताना शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसविले आहेत. त्यांनी अधिकाराचा मनमानी पद्धतीने गैरवापर करत नियमबाह्य अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती दिल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक व्यवहार झाला असल्याची शक्यता आहे. देसाई यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील एका मयत मुख्याध्यापकाच्या मुलाला चौकीदार या पदावर नियुक्ती देताना नियमांचे उल्लंघन करून नियुक्ती आदेश दिलेला आहे. या मयत मुख्याध्यापकाच्या मुलाला चौकीदार या पदावर नियुक्ती दिल्यानंतरही जाणीवपूर्वक त्याचे नाव अपर आयुक्त, ठाणे या कार्यालयाच्या प्रतीक्षायादीमध्ये ठेवण्यात आले. वास्तविक चौकीदार या पदावर नियुक्ती दिल्यानंतर त्याचे नाव वर्ग ३ च्या प्रतीक्षा यादीमधून वगळणे आवश्यक होते. या चौकीदार या पदावर नियुक्ती आदेश दिलेल्या कर्मचाऱ्याचे नाव ठाणे या कार्यालयाच्या वर्ग ३ च्या सेवाज्येष्ठता यादीमधून वगळण्याबाबत त्यांनी वरिष्ठ कार्यालयास जाणीवपूर्वक कोणताही पत्रव्यवहार केला नसल्याचे दिसून येते. यासोबतच आंबेगाव तालुक्यातील फुलवडे येथील अनुदानित आश्रमशाळेतील मदतनीस पदावर कार्यरत असणाऱ्या मयत कर्मचाऱ्याच्या पत्नीने तब्बल तीन वर्षानंतर नोकरीसाठी संस्थेकडे अर्ज केल्यानंतर संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावास देसाई यांनी तत्काळ मान्यता दिली आहे. वास्तविक पाहता अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी मयत कर्मचाऱ्याच्या कुटुंबीयांनी नोकरीसाठी एक वर्षाच्या आतमध्ये अर्ज करणे आवश्यक आहे. जर त्यांनी एक वर्षामध्ये अर्ज केला नाही तर विलंबाने केलेल्या अर्जाचा कालावधी क्षमापित करण्याचा अधिकार हा फक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आला आहे. या दोन्ही प्रकारच्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीमध्ये देसाई यांनी शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले असून या प्रकारची चौकशी करून शासनाने देसाई यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, असे निवेदनात नमूद केले आहे.


ही तक्रार अत्यंत चुकीची व वैयक्तिक द्वेषभावनेने केलेली आहे. अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती संबंधित कुटुंबातील नामनिर्देशित सदस्याच्या अनुषंगाने त्या कुटुंबाला दिलेला लाभ आहे. तो त्यांचा अधिकार असून संबंधित तक्रारीत कोणतेही तथ्य नाही.
- प्रदीप देसाई, प्रकल्प अधिकारी, घोडेगाव (ता. आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्री थोडक्यात बचावले, उड्डाण घेताच मागे जाऊ लागलं हेलिकॉप्टर, मोठी दुर्घटना टळली!

IND vs AUS, 1st T20I: भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची दणक्यात सुरुवात; पावसाने खोडा घातला, पण सिडनीत विजय मिळवला

Pune: महाशिवरात्री उत्साहाला गालबोट! हरिश्चंद्र गडावर दुर्दैवी घटना, दर्शनाहून परतताना भाविकावर काळाचा घाला

T20 WC, IND vs PAK: अभिषेक शर्माचं कमबॅक होणार, कुलदीप यादवही खेळणार! भारताची पाकिस्तानविरुद्ध कशी असेल प्लेइंग इलेव्हन?

Shashikant Shinde: विलीनीकरण चर्चेस आता पूर्णविराम, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचे स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT