जुन्नर, ता. १ : ‘‘जुन्नर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर नगर विकास खात्याकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही. जुन्नर तालुक्यातील पर्यटन क्षेत्राला वाव देण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
जुन्नर येथे सोमवारी (ता. १) नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते. ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्याचे काम केले आहे. ज्या उमेदवारांच्या पाठीशी महिलांचा पाठिंबा असतो, त्या उमेदवाराचा विजय निश्चित असतो. सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन राज्याचा कारभार चालवला आहे. शासन आपल्या दारी ही योजना प्रभावीपणे राबवून राज्यातील चार कोटी नागरिकांना या योजनेचा फायदा झाला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जवळपास ७० हजार कुटुंबांना ४५० कोटी रुपयांची मदत केली आहे.’’
याप्रसंगी आमदार शरद सोनवणे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबू पाटे, प्रसन्ना डोके, जीवन शिंदे, संतोष चव्हाण, ॲड. सचिन चव्हाण, धनंजय डुंबरे
उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.