पुणे

महसूल कर्मचाऱ्यांचे जुन्नरमध्ये आंदोलन

CD

जुन्नर, ता. १६ : मावळ तालुक्यातील तहसीलदारांसह अन्य महसूली कर्मचाऱ्यांवर शासनाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या विरोधात जुन्नर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन छेडत सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (ता. १५) जुन्नर तालुक्याचे तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल मंडलाधिकारी, महसूल कर्मचारी, ग्राम महसूल अधिकारी व कोतवाल सर्वांनीच कामबंद आंदोलन पुकारत तहसील कार्यालयाच्या आवारात आंदोलनास बसले आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना जुन्नर तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघटना व जुन्नर तालुका महसूल कर्मचारी संघटना यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.
जोपर्यंत या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घेतले जात नाही, तोपर्यंत सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा जुन्नर तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी दिला आहे. तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयात एकत्र येऊन डीएससी, पेनड्राइव्ह जमा केल्या. मात्र, महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसला आहे. तहसील व तलाठी कार्यालये बंद असल्याने नागरिकांची कामे मार्गी न लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Second Setback : हसन मुश्रीफांना सलग दुसरा राजकीय धक्का! जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा कांबळेंचा जातीचा दाखला अवैध

सोने-चांदीच्या भावात विक्रमी घसरण, ३ वर्षांची वाढ झाली कमी; जाणून घ्या आज किती भाव

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Pune Trekking : ट्रेकर्ससाठी महत्त्वाचा इशारा! पर्यटकांनो साहस करा; पण जपून, निसर्गसौंदर्याचा आनंद लुटताना काळजी घेण्याचे आवाहन

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT