पुणे

जुन्नरच्या उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार?

CD

जुन्नर, ता. ११ : जुन्नर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार शरद सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या सुजाता मधुकर काजळे या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा म्हणून निवडून आल्या. नगराध्यक्षा काजळे यांनी सोमवारी (ता. ५) नगराध्यक्ष पदाची सूत्रे स्वीकारली. आता नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदी तसेच स्वीकृत नगरसेवकपदी कुणाची वर्णी लागणार याकडे शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पक्षीय बलाबल पाहता उपनगराध्यक्ष राखण्यात शिवसेनेला यश येईल अशी चर्चा आहे. दरम्यान, मंगळवारी (ता. १३) उपनगराध्यक्षपदाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे.
जुन्नर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक चांगलीच रंगतदार अवस्थेत पार पडली. नगराध्यक्षपदासाठी अपक्षांसह एकूण नऊ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये शिवसेनेच्या सुजाता काजळे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्नेहल खोत, भाजपच्या ॲड. तृप्ती परदेशी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या गौरी शेटे, काँग्रेसच्या राहीन कागदी यांसह अन्य अपक्ष महिला उमेदवारांनी निवडणूक लढवली. जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. त्यादृष्टीने त्यांनी निवडणूक काळात शहरात ठाण मांडून प्रचार यंत्रणा हातात घेतली होती. शहरातील बहुतांशी सर्वच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसने काढलेल्या प्रचार रॅलीत बेनके हे सहभागी झाले होते. दरम्यान, निवडणूक निकालानंतर शिवसेनेच्या सुजाता काजळे यांनी ५१४६ मते घेत राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अवघ्या २८२ मतांनी पराभव केला. तर या निवडणुकीत काँग्रेसच्या कागदी यांनी तब्बल ३८७६ मते घेतली. कागदी यांची मते निर्णायक ठरली व त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला बसल्याची जनतेमध्ये चर्चा आहे. तर या निवडणुकीत माजी आमदार अतुल बेनके यांच्या पेक्षा आमदार शरद सोनवणे यांची रणनीती सरस ठरल्याची देखील नागरिकांमध्ये चर्चा आहे. शिवसेनेने नगराध्यक्ष यांच्यासह काँग्रेस व एक अपक्ष नगरसेवक यांच्या मदतीने ११ नगरसेवकांचा शिवसेना व शिवजन्मभूमी विकास मंच नावाने स्वतंत्र गट स्थापन केला असून विक्रम परदेशी यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन एक अपक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांच्या मदतीने जुन्नर शहर विकास आघाडी स्थापन करून आठ नगरसेवकांचा गट स्थापन केला आहे तर वैष्णवी श्याम पांडे यांची गटनेता म्हणून निवड केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील उपनगराध्यक्ष पदासाठी प्रयत्नशील असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. तर भाजपचे नगरसेवक अनिल रोकडे यांनी सांगितले की, ‘‘सध्या आम्ही भाजपचे दोन्ही नगरसेवक तटस्थ आहोत. प्रत्यक्ष निवडीच्या प्रक्रियेदरम्यान परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल.’’

पक्षीय बलाबल
शिवसेना : ८
राष्ट्रवादी काँग्रेस : ६
भाजप : २
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष : १
काँग्रेस : १
अपक्ष : २
एकूण जागा : २०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT