पुणे

माणिकडोह येथे शिवणकला प्रशिक्षण

CD

जुन्नर, ता. १२ ः माणिकडोह (ता. जुन्नर) येथे राजमाता जिजाऊ जयंतीचे औचित्य साधून मोफत शिवणकला प्रशिक्षण व उद्यम आधार कार्ड वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
डिसेंट फाउंडेशन, पुणे, हायस्पीड स्किल हब जुन्नर व पेसा ग्रामपंचायत माणिकडोह यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमास सोमवारी (ता. १२) ठाकरवाडी येथील सांस्कृतिक भवनात सुरुवात केल्याची माहिती डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई व सरपंच ज्ञानेश्वर खंडवे यांनी दिली. या उपक्रमांतर्गत गावातील महिलांना ४० दिवस शिवणकलेचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर महिलांना प्रमाणपत्र व उद्यम आधार कार्ड देण्यात येणार असल्याचे उपसरपंच अविनाश ढोबळे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनविणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे बिडवई यांनी सांगितले.
याप्रसंगी हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत, डिसेंट फाउंडेशनचे सेक्रेटरी डॉ. एफ. बी. आतार, आदिनाथ चव्हाण, गणेश मेहेर, प्रशिक्षक छाया पाटील, उज्ज्वला गवळी, सरपंच ज्ञानेश्वर खंडवे, उपसरपंच अविनाश ढोबळे, ग्रामविकास अधिकारी तानाजी अंभीरे, सदस्य सागर दुधवडे, विजय पारधी, उज्ज्वला ढोबळे, संगीता ढोबळे, नूतन ढोबळे, त्रिवेणी जाधव व प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या .

03079

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT