पुणे

जुन्नरला अर्ज घेण्यासाठी इच्छुकांची गर्दी

CD

जुन्नर, ता. १६ : जुन्नर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी पहिल्याच दिवशी एकूण ८६ नामनिर्देशन पत्र इच्छुक उमेदवारांकडून घेण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सुनील शेळके यांनी दिली.
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारापासून (ता. १६) उमेदवारांना नामनिर्देशन पत्र देण्यास सुरुवात झाली. नामनिर्देशन पत्रे देणे अथवा स्वीकारणे ही प्रक्रिया जुन्नर तालुका पंचायत समितीच्या कार्यालयात सुरू राहणार आहे.
उमेदवारी अर्ज घेण्यासाठी तालुका पंचायत समितीच्या आवारात विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली.
तालुक्यातील काही गटांमध्ये इच्छुक उमेदवारांची आपापल्या पक्षांकडे उमेदवारी मिळवण्यासाठी धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही गटांमध्ये राजकीय पक्षांना अपेक्षित उमेदवार भेटण्यासाठी शोधाशोध करावी लागत असल्याचे चित्र आहे. यामुळे एखाद्या गटात उमेदवारीसाठी रस्सीखेच तर एखाद्या गटात उमेदवाराची पळवापळव केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राजकीय पक्षाच्या वरिष्ठांनी एकापेक्षा अधिक उमेदवारांबाबत वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याने उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ३५ % वाढ होणार ? मोठी अपडेट समोर

Nashik Mhada Scam : तुकडेबंदी कायद्याचा गैरवापर अन् बनावट कागदपत्रे; नाशिकमधील 'त्या' ४९ प्रकल्पांचे बिंग फुटले

Rohit Sharma Video: 'भाऊ तू फक्त फिल्डिंग कर...', रोहितने 'कच्चा लिंबू' खेळाडूबद्दल मराठीतून ऐकवला मजेशीर किस्सा

Solapur Fertilizer Price Hike: युद्ध लांबल्यास खतांच्या दरवाढीची शक्यता; खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आयात होणार बंद

Latest Marathi Update : बुलढाण्यात १४ गॅस सिलिंडर जप्त

SCROLL FOR NEXT