जुन्नर, ता. २९ : दिवंगत पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने जुन्नर शहरातील नागरिकांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी हळहळ व्यक्त केली. शहरातील नागरिकांनी व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पवार यांच्या जुन्नर शहराच्या विकासात असलेल्या कार्याला यानिमित्ताने उजाळा दिला.
शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मुख्य बाजारपेठ असलेल्या शंकरपुरा पेठेत एकत्र येऊन अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण सामूहिक आदरांजली वाहिली.
यावेळी सुनील ढोबळे, अनिल रोकडे, गणेश महांबरे, संदेश बारवे, चंद्रकांत कदम, आकाश परदेशी, शिवाजी डोंगरे, बाळासाहेब शिंदे, चंद्रकांत डोके, ॲड. सिद्धेश ढोले, राजेश ढोबळे, संचित गुंजाळ, सचिन तांबोळी, संदीप घोणे यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
याबाबत माजी नगरसेवक सुनील ढोबळे यांनी सांगितले की, जुन्नर शहराच्या विकासामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. गेल्या काही वर्षात पवार यांच्या नेतृत्वाखाली शहरात महत्त्वाची विकासकामे मार्गी लागली. शहरातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण अशी शेकडो कोटींची विकासकामे अजित पवार यांच्या माध्यमातून शहरात करण्यात आली.
03144
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.