जुन्नर ता. २९ ः जुन्नर नगर परिषदेच्या प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सुजाता काजळे या ॲक्शन मोडवर आल्याचे चित्र दिसत आहे. काजळे यांनी गुरुवारी (ता. २९) जुन्नर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या फिल्टर प्रकल्पाला अचानक भेट देऊन पाहणी केली.
यावेळी काजळे यांनी शहराला वेळेत स्वच्छ पाणीपुरवठा होईल, याबाबत परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी दक्ष राहावे, याबाबतच्या सूचना दिल्या. तसेच, फिल्टर प्रकल्पाच्या परिसरात असलेली अस्वच्छता तत्काळ दूर करण्याबाबत कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. या परिसरात अर्धवट अवस्थेत असलेल्या शौचालयाचे उर्वरित काम जलदगतीने पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही काजळे यांनी दिली. तसेच, याप्रसंगी काजळे यांनी माणिकडोह धरणातून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेच्या सुरू असलेल्या कामाबाबत माहिती घेतली.
यावेळी कर्मचारी रोहित बोटे, किरण धोत्रे, मनोज मांडवे, अजय घागरे, सार्थक शेळकंदे, आरोग्य विभाग प्रमुख गुणवरे यांसह नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.
03152
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.