जुन्नर, ता. ३१ : जुन्नर येथील हजरत पीर सैयद इशाक शाह कादरी (रह.) यांचा ३६१ वा उरुस धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आल्याची माहिती ट्रस्टच्या वतीने व्यवस्थापकीय विश्वस्त सैयद शहनवाज पीरझादा यांनी दिली. मंगळवार (ता. २७) ते शुक्रवार (ता. ३०) या कालावधीत विविध उपक्रम झाले. या कालावधीत सुमारे दहा हजारांहून अधिक भाविकांनी दर्गा आणि मशिदीस भेट देऊन दर्शन घेतले.
या निमित्त मोफत वैद्यकीय तपासणी, रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला. यासोबतच पीर कुटुंबाची वंशावळ (फॅमिली ट्री) सादरीकरण, जुलूस, कुरआन खानी, धार्मिक प्रवचने तसेच संदल व हलका-ए-कादरी हे धार्मिक कार्यक्रमही झाले. याप्रसंगी डॉ. रफिक मोकाशी, डॉ. अक्षय शेवाळे, साकिब शरीफ कागदी, गुरुनाथ चव्हाण, मझहर शेख यांसह नागरिक उपस्थित होते. उपक्रमाचे नियोजन विश्वस्त मोहमद अजाज पठाण, गुलाम मोहिउद्दीन पीरझादा, अब्दुल रज्जाक पीरझादा, अब्दुल बासित पीरझादा, आदिब पीरझादा यांनी या उपक्रमांचे नियोजन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.