जुन्नर, ता. ४ ः सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. मतदानाची प्रत्यक्ष प्रक्रिया सात तारखेला होणार असून निवडणूक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचे साहित्य ताब्यात घेण्यासाठी सहा तारखेला हजर रहावे लागणार आहे. मात्र, बहुतांशी प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची सात व आठ तारखेला केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा असल्याने या शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. नेमकी शिक्षक पात्रता परीक्षा द्यायची की निवडणुकीच्या कामकाजाला हजेरी लावायची या द्विधा मनःस्थितीमध्ये असलेल्या शिक्षकांसाठी प्रशासनाकडून दिलासा देण्यात आला आहे.
याबाबत निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. स्वप्निल मोरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनील शेळके यांनी सांगितले की, ज्या शिक्षकांची शिक्षक पात्रता परीक्षा शनिवारी (ता. ७) होणार आहे त्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामकाजातून पूर्णतः वगळण्यात आले आहे. यामुळे ज्या शिक्षकांची परीक्षा सात तारखेला होणार आहे त्यांना निवडणूक कामकाजातून दिलासा मिळाला आहे. मात्र ज्या शिक्षकांची परीक्षा रविवारी (ता. ८) होणार आहे त्या शिक्षकांना मात्र निवडणुकीच्या कामातून वगळण्यात आले नाही. त्या शिक्षकांनी शुक्रवारी (ता. ६) रोजी मतदानाचे साहित्य घेण्यासाठी श्री क्षेत्र लेण्याद्री येथे आदेशात नमूद केलेल्या वेळेप्रमाणे उपस्थित राहायचे आहे. शुक्रवारी (ता. ६) व शनिवारी )(ता. ७) या दोन्ही दिवशी नेमून दिलेल्या कामकाजावर हजर राहून निवडणूक कामकाजाचे कर्तव्य बजावायचे आहे. जे शिक्षक कर्मचारी गैरहजर राहतील अशा शिक्षकांवर कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा देखिल डॉ. मोरे व डॉ. शेळके यांनी दिला आहे. दरम्यान, सात तारखेला १९८ तर आठ तारखेला १७१ शिक्षकांची पात्रता परीक्षा होणार आहे. निवडणुकांची तारीख व काही शिक्षकांची पात्रता परीक्षा एकाच दिवशी आल्याने निवडणुकीच्या प्रक्रियेत प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.