जुन्नर, ता. ६ ः जुन्नर तालुक्यातील ३५ शाळांना डिसेंट फाउंडेशनच्या माध्यमातून सॅनिटरी नॅपकिन वेडिंग मशिन व डिसपोजल मशिन भेट देण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र बिडवई यांनी दिली.
या अभियानाचा प्रारंभ बारव (ता. जुन्नर) येथील प्राथमिक विद्यामंदिरात करण्यात आला. ॲशलँड इंटरनॅशनल स्पेशालिटी प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर फंडातून या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. तालुक्यातील बारव, निरगुडे, आपटाळे, इंगळूण, चिंचोली, सावरगाव यांसह ३५ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. यामुळे विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात स्वच्छता, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने मोठा लाभ होणार आहे. मुलींमध्ये मासिक पाळीबाबत असलेले गैरसमज दूर होऊन स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे बिडवई यांनी सांगितले.
यावेळी मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य, मासिक पाळीतील घ्यावयाची काळजी, वैयक्तिक स्वच्छता व स्वसंरक्षण या महत्त्वाच्या विषयांवर विद्यार्थिनींना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी या सर्व शाळांतील विद्यार्थिनींना पर्यावरणपूरक सॅनिटरी नॅपकिन सोबतच कळी उमलताना या मार्गदर्शक पुस्तिकेचे वाटप करण्यात आले. जुन्नर पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी अशोक लांडे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
याप्रसंगी डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉ. एफ. बी. आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, श्री शिवाजी मराठा शिक्षण संस्थेचे खजिनदार सुनील ढोबळे, डॉ. संपदा तोडकर, परिचारिका उज्ज्वला गवळी, छाया पाटील, मुख्याध्यापक राजेंद्र ढोबळे यांसह शिक्षक व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
03187
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.