जुन्नर, ता. २६ : जुन्नर नगर परिषदेच्या २०२६-२७ आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाच्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. २७) सायंकाळी चार वाजता नगराध्यक्षा सुजाता काजळे यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेच्या छत्रपती संभाजी महाराज सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, नगरपरिषदेच्या निवडणुकीनंतर नगरपरिषदेच्या झालेल्या काही वादळी सभांमुळे नगरपरिषदेच्या कारभारामध्ये नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. नगराध्यक्ष व सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांमध्ये झालेल्या वादामुळे या सभेकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. तर जुन्नर शहरातील नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळण्यासाठी नवनियुक्त नगरसेवकांनी काम करावे, अशी अपेक्षा शहरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या सभेमध्ये नगरपरिषदेच्या १३८ कोटी १५ लाख ३०५६ रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान जुन्नर नगरपरिषदेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रक मंजुरीसाठी बुधवारी (ता. ११) दुपारी चार वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र अंदाजपत्रकाची प्रत सदस्यांना एक दिवस आधी म्हणजे १० तारखेला मिळाली असल्याने व बहुतांशी सदस्य हे नवखे असल्याने अंदाजपत्रकाबाबत काही दुरुस्ती अथवा त्रुटी असल्यास त्यावर अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ नसल्याने सर्वानुमते ही सभा तहकूब करून शिवजयंती महोत्सव झाल्यानंतर सभा घेण्याचे ठरले असल्याचे सत्ताधारी शिवसेना शिवजन्मभूमी विकास मंचचे गटनेते विक्रम परदेशी व जुन्नर शहर विकास आघाडीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे यांनी सांगितले. त्यानुसार या सभेचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.