जुन्नर, ता. १ : जुन्नर तालुक्यातील येणेरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत बाल विज्ञान प्रदर्शन आणि संगणक कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.
या शाळेला एसकेएफ इंडिया लिमिटेडकडून दहा लॅपटॉप भेट देण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाशी जोडून घ्यावे, या उद्देशाने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व याद्वारे शाळेला सहा लक्ष रुपये किमतीचे लॅपटॉप भेट देण्यात आले. याप्रसंगी कंपनीचे सीएसआर हेड मयूर देशमुख यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ग्रामस्थ गणेश भुजबळ आणि मित्र परिवाराकडून दहा कीबोर्ड आणि माऊस भेट देण्यात आले. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगणक कक्षाचे फर्निचर, सुशोभीकरण करण्यात आले.
याप्रसंगी कंपनीचे अधिकारी मयूर देशमुख, पंचायत समितीचे सदस्य अमित ढोले, सरपंच अमोल भुजबळ,गणेश भुजबळ, स्वाती ढोले, सत्यवान घोगरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश पानसरे, उपाध्यक्ष कल्याणी घोगरे, मुख्याध्यापिका प्रमिला आमले, वैभव सदाकाळ, गिरीश चाळणेवाड उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव सदाकाळ यांनी तर आभार प्रमिला आमले यांनी मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.