पुणे

जुन्नरकरांच्या पाणीपट्टीत २० टक्क्यांनी कपात

CD

जुन्नर, ता. ३: जुन्नर शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर,महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले व हुतात्मा राजगुरू यांची पूर्णाकृती स्मारके उभारण्यासाठी नव्याने निधीची तरतूद करत २०२६-२७ साठी प्रशासनाने ठरवलेल्या पाणीपट्टी दरामध्ये २० टक्क्यांनी कपात करून २५०० वरून दोन हजार करण्यात आल्याने शहरातील नागरिकांना दिलासा देण्यात आला असल्याची माहिती प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सुजाता काजळे यांनी दिली.
जुन्नर नगरपालिकेचा २०२६-२७ साठीचा १५० कोटी १३ लाख रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पाला सभागृहात मंजुरी मिळाली असल्याची माहिती नगराध्यक्षा सुजाता काजळे व जुन्नर विकास आघाडीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे यांनी दिली. जुन्नर नगरपालिकेच्या अर्थसंकल्पाच्या मंजुरीची सभा शुक्रवारी (ता. २७ फेब्रुवारी) पार पडली. या सभेमध्ये नगरपालिका खर्च, उत्पन्न, शासन योजना इत्यादी विविध विषयांवर चर्चा झाली. नगराध्यक्षा काजळे यांनी सांगितले की, या अर्थसंकल्पात गोशाळा, भटक्या कुत्र्यांसाठी कुत्रा घर उभारणी, अनधिकृत नळ जोड आढळल्यास २० हजार रुपये दंडाची तरतूद यासह अन्य मुख्य तरतुदी करण्यात आल्या आहे.
जुन्नर विकास आघाडीच्या गटनेत्या वैष्णवी पांडे यांनी सांगितले की, या सभेत कुठल्याही प्रकारची कर वाढ करू नये, नगरपालिका उत्पन्न व खर्च याचा ताळमेळ साधावा, नगरपालिकेच्या वापराविना असलेल्या इमारती, एस. एम. जोशी हॉल, वरली आळी सभागृह यांचा योग्य वापर होऊन शासनाकडून भाडे निर्मिती करून त्या इमारती वापरात आणाव्यात व उत्पन्न वाढवावे, महिला बालकल्याण, दिव्यांग कल्याणकारी योजना याच्यावर पाच टक्के तरतूद करावी यांसह अन्य सूचना त्यांनी केल्या. जुन्नर नगरपालिकेची शाळा स्मार्टस्कूल पद्धतीने पुनर्निर्माण करणे, शहरातील विद्युत जाळे भूमिगत करणे, नागरिकांना दर्जेदार आरोग्य, पाणी, वीज या सुविधा पुरविण्याबाबत यावेळी सर्वानुमते ठरल्याचे देखील पांडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: निर्णय झाला! काँग्रेसचं शरद पवारांच्या नावाला समर्थन; एका जागेवरुन 'या' नेत्यांमध्ये सुरु होती रस्सीखेच

Shivneri Bus: एसटीची ‘शिवनेरी’ बस आता राज्यभर धावणार! स्लीपर कोचची एंट्री; कुठून कुठे जाणार? प्रताप सरनाईकांनी सांगितली यादी

Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांना गुणांसोबत संस्कारही द्या - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या डे-नाईट टेस्टसाठी भारतीय संघात मोठा बदल; कधी अन् कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT