पुणे

वारकरी शिक्षण संस्थेचा अमृत महोत्सव

CD

जुन्नर, ता. ४ : ‘‘वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून रामदास बाबा मनसुख यांनी सांप्रदायिक क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन प्रत्येकाने सामाजिक व सांप्रदायिक क्षेत्रात कार्यरत राहिले पाहिजे.’’ असे प्रतिपादन जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी केले.
निमगाव (ता. जुन्नर) येथील वारकरी संप्रदायाचे शिक्षण देणाऱ्या ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आमदार सोनवणे बोलत होते. यावेळी भाजपच्या चिटणीस वर्षा डहाळे, पिंपरी चिंचवडचे महापौर रवि लांडगे, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक संतोष चव्हाण, पंचायत समिती सदस्य संजय वऱ्हाडी, अमित ढोले, ज्ञानमंदिर अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष भगवान मनसुख, ज्ञानमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष पंढरीनाथ वाघुले, अरुण पारखे, पोपट खंडागळे, प्रशांत पाबळे उपस्थित होते.
ज्ञानमंदिर वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना १९५० मध्ये रामदासबाबा मनसुख यांनी केली होती. संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील नामवंत, प्रवचनकार व कीर्तनकारांची सेवा उत्साहात झाली. पाडुरंग महाराज घुले, एकनाथ चत्तरशास्त्री, संदीपान शिंदे, प्रकाश जवंजाळ, पोपट महाराज कासारखेडकर, संजय पाचपोर, एकनाथ सदगिर यांची कीर्तन सेवा झाली. बंडातात्या कराडकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता झाली. यावेळी संतवीर रामदासबाबा मनसुख जीवनगौरव पुरस्कार २०२६ बंडातात्या कराडकर, राजाराम जाधव यांना प्रदान करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT