पुणे

जुन्नर येथे शिवभक्तांमध्ये नाराजी

CD

जुन्नर, ता. ७ : तिथीनुसार साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीसाठी किल्ले शिवनेरी येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने शिवभक्त आले होते. किल्ले शिवनेरीकडे जाण्यापूर्वी आलेले शिवभक्त गडाच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौकातील पुतळ्यासमोर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी आवर्जून थांबत होते. मात्र तिथीनुसार शिवजयंती असल्याने व मोठ्या संख्येने शिवभक्त आलेले असतानादेखील स्थानिक प्रशासनाने मात्र छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला साधा हार देखील न घातल्यामुळे शिवभक्तांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली, तर शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख योगेश पाटे यांनी स्थानिक नगरपालिका प्रशासनाच्या या कृतीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. तर जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला प्रशासनाकडून दररोज पुष्पहार अर्पण करावा, अशी मागणी शिवभक्तांमधून केली गेली.

दरम्यान, किल्ले शिवनेरीवर शिवजन्मस्थळावरील शिवजन्माचा सोहळा संपल्यानंतर संबंधित विभागाने शिवजन्मस्थळ बंद केल्याने गडावर आलेल्या शिवभक्तांना शिवजन्मस्थळाचे दर्शन घेता आले नाही. ‘‘किमान तिथीनुसार शिवजयंतीच्या दिवशी तरी शिवभक्तांना दर्शन घेण्यासाठी प्रशासनाने शिवजन्मस्थळ खुले ठेवणे आवश्यक होते,’’ असे पाटे यांनी सांगितले. याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. चरण कोल्हे यांच्याशी संपर्क साधला असता होऊ शकला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur: धार्मिक प्रतीकांवरून धर्मांतर ठरू शकत नाही; ठोस पुरावे आवश्यक, मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

तिकिटावरून वाद, आधी शाब्दिक चकमक, नंतर बेदम हाणामारी; चालत्या बसमध्ये महिला वाहक आणि प्रवाशाचा तुफान राडा, पाहा व्हिडिओ

ई-चालानची कडक कारवाई, पण दंड वसुलीचे काय? १ हजार ३४३ कोटी रुपयांच्या रक्कमेची थकबाकी

Property Tax: मालमत्‍ता कर थकवणाऱ्यांविरोधात महापालिकेचं मोठं पाऊल; नोटीस जारी, अंतिम मुदत काय?

DigiMHADA App : म्हाडा झालं डिजिटल! कुठेही जायची गरज नाही, 'या' सेवा मिळतील एकाच अ‍ॅपवर

SCROLL FOR NEXT