पुणे

वैभव सदाकाळ यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार

CD

जुन्नर, ता. ९ : येणेरे (ता. जुन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे उपक्रमशील शिक्षक वैभव बबनराव सदाकाळ यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संगमनेर (जि. अहिल्यानगर) येथे रविवारी (ता. ८) पी. आर. के. प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित सोहळ्यात हा गौरव करण्यात आला.
माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व अभिनेते डॉ. सागर फापाळे यांच्या हस्ते सदाकाळ यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सदाकाळ यांनी शाळेत आनंददायी शिक्षण, बोलक्या भिंती आणि तंत्रज्ञानाचा वापर करून शाळेचा कायापालट केला आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे शाळेला ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक व जिल्हा परिषद अध्यक्ष चषक मिळाला आहे. त्यांच्या या शैक्षणिक योगदानाची दखल घेऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिक्षक नेते हिरालाल पगडा, संदीप दातिर, वैभव जाधव, दिलीप लोहकरे, दीपक पानसरे, विजय नाहटा, उल्हास पाटील, सुधाकर पाटील, संदीप काकड, जयराम ढेरंगे, अंतुन मिसाळ यांच्यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

03351

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT